नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा बाजारावर परिणाम होत असून आंतरराष्ट्रीय बाजारात बुधवारी कच्च्या तेलाच्या भावात १८ वर्षाच्या नीचांकावर आला आहे. भारतीय वायदा बाजारात कच्या तेलाच्या भावात १,६७२ रुपये प्रति बॅरल म्हणजे १०.५१ रु. प्रति लिटरपर्यंत तुटला आहे. ज्यामुळे लोकं आता अपेक्षा करत आहेत की, येणाऱ्या दिवसात पेट्रोल-डिझेलच्या किंमती आणखी खाली येतील.
आंतरराष्ट्रीय बाजारात सतत घसरण
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर रात्री १० वाजता कच्च्या तेलाच्या मार्च अनुबंधात मागच्या सत्रापासून ४०० रु. म्हणजे १९०.९ टक्के घसरणीसह १,६९५ रु. प्रति बॅरलवर व्यापार सुरु होता, जेव्हा याअगोदरचा भाव १,६७२ रु. प्रति बॅरलपर्यंत खाली आला. एक बॅरलमध्ये १५९ लिटर कच्चे तेल असते. याप्रकारे एक लिटर कच्च्या तेलाची किंमत देशात १०.५१ रु. होईल. इंटरकॉन्टिनेंल एक्सचेंजवर ब्रेंट क्रूडच्या मे अनुबंधात मागच्या सत्रापासून ३.२१ डॉलर म्हणजे ११.१७ टक्के घसरणीसह २५.५२ डॉलर प्रति बॅरलवर होते, जेव्हा याअगोदर ब्रेंटचा भाव २५.३३ डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आला असून तो २००३ नंतरचा सर्वात खालचा स्तर आहे.
पुढेही घट होण्याची शक्यता
न्यूयॉर्क मर्के टाइल एक्सचेंजवर वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटचा भाव ४.४७ डॉलर म्हणजे १६.३६ टक्क्यांनी घसरून २२.८६ डॉलर प्रति बॅरलवर आला. जेव्हा डब्ल्यूटीआयचा भाव २२.५९ डॉलर प्रति बॅरलवर आला. बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कच्च्या तेलाची मागणी कमी झाली आहे आणि तेलाच्या बाजारभावातील किंमती युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाले आहे.