मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – ‘दूरसंचार नियामक प्राधिकरणा’ने (ट्राय) काही महिन्यांपासून लागु केलेल्या नियमांनुसार डीटीएच आणि केबलधारकांना आपल्या पसंतीचे चॅनेल निवडण्याचे स्वातंत्र्य दिले. मात्र त्यानंतर ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावं लागत आहे. कंपनी ग्राहकांना हवे ते चॅनेलचा पुरवठा होत नाहीत, तसेच कंपन्यांच्या वेबसाइट आणि मोबाइल अॅप्सवरील क्लिष्ट प्रक्रियेमुळे ‘ब्रॉडकास्टिंग’संदर्भात नवे धोरण लागू करूनही असे प्रकार सातत्याने होत होत आहेत. पूर्वीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागत असल्याचंही ग्राहकांनी सांगितलं आहे. त्यावर उपाय म्हणून ‘ट्राय’ने अनेक प्रयत्न केले.असं असताना ट्रायने जरी केलेल्या नवीन नियमांच्या यादीनुसार डीटीएच धारकांना आता केवायसी (KYC ) करणं बंधनकारक असणार आहे.
‘ट्रायने आता सर्व डीटीएच ऑपरेटर्संना ग्राहकांचे केवायसी करण्याचे आदेश दिले आहेत. केवायसीसंदर्भातील हा नियम जुन्या आणि नवीन दोन्ही ग्राहकांना लागू होणार आहे. जुन्या ग्राहकांना केवायसी करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी देण्यात येईल, तर नवीन ग्राहकांना डीटीएच खरेदी करता केवायसी करावं लागेल. सिमकार्ड खरेदी करताना ज्या प्रकारे केवायसी प्रक्रिया असते त्याच प्रमाणे आता डीटीएचसाठीही करावी लागणार आहे.
दरम्यान डीटीएच धारकांसाठी खूशखबर आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्रायनं दिलेल्या आदेशानुसार डिस्ट्रीब्युशन प्लॅटफॉर्म्स ऑपरेटर्सना (डीपीओ) आता एका SMS च्या माध्यमातून चॅनल सबस्क्राइब किंवा अनसबस्क्राइब करता येणार आहे, ट्रायच्या आदेशानुसार ९९९ क्रमांकावर सर्व चॅनल्सची यादी एमआरपीसह उपलब्ध करून देण्यात यावी, ही सुविधा दिल्यानं डीटीएचधारकांना आपल्या पसंतीचे चॅनल निवडता येणार आहेत. तसंच प्रत्येक चॅनलसाठी आपण किती पैसे मोजणार आहोत याचीही माहिती मिळणार आहे.
Visit : Bahujannama.com