मुंबई : बुहजननामा ऑनलाइन – राज्यात काल विधानसभा निवडणुकीचा निकालांनंतर महायुतीला पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याची संधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाआघाडीच्या देखील चांगल्या जागा आल्या परंतु वंचित बहुजन आघाडीमुळे या दोन्ही पक्षांना चांगलाच फटका बसला आहे. राज्यातील २८८ मतदारसंघापैकी ३२ जागांवर वंचितमुळे काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांना प्रभाव स्वीकारावा लागला.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने कोणत्याही पक्षासोबत युती न करता स्वबळावर निवडणूक लढविली. राज्यातील २८८ मतदारसंघात वंचितने उमेदवार उभे केले होते. भाजपची बी टीम असल्याचा वंचितवर आरोप केला जात आहे, परंतु ह्या अफवा असल्याने कोणीही त्यावर विश्वास ठेवू नये असे, वंचित चे कार्यकर्ते म्हंटले होते. परंतु काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीसोबत वंचितची आघाडी झाली असती तर राज्यातील चित्र आणखी वेगळे दिसले असते असे निवडणूक निकालावरून आता स्पष्ट झाले आहे.
राज्यातील जवळपास ३२ मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार अगदी ५ ते १० हजार मतांच्या फरकाने पडले असून त्याच मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांनी १० हजारांहून अधिक मते घेतली आहेत.
१) चाळीसगाव मतदारसंघ – भाजपच्या मंगेश चव्हाण यांना ८५ हजार २८६ मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजीव देशमुख यांना ८१ हजार २८८ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीच्या राकेश जाधव यांना ३८ हजार ३६१ मते मिळाली.
२) बुलडाणा मतदारसंघ – शिवसेनेचे उमेदवार संजय गायकवाड यांना ६७ हजार ३८ मते मिळाली तर काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन सपकाळ यांना ३० हजार ८१० मते मिळाली. या ठिकाणी वंचितचे उमेदवार विजय शिंदे यांना तब्बल ४१ हजार १७३ मते मिळाली.
३) चिखली मतदारसंघ – भाजपच्या श्वेता महाले यांना ९२ हजार ७६० मते पडली तर काँग्रेसचे उमेदवार राहुल बोंद्रे यांना ८६ हजार ७२ मते मिळाली. वंचितचे उमेदवार अशोक सुराडकर यांना या ठिकाणी ९ हजार ६०५ मते पडली.
४) सिंदखेड मतदारसंघ – राष्ट्रवादीच्या डॉ. राजेंद्र शिंगणे यांना ८० हजार ८०८ मते पडली. तर शिवसेनेच्या डॉ. शशिकांत खेडेकर यांना ७२ हजार ११ मते पडली. वंचितच्या सविता मुंडे यांना ३९ हजार ६१७ मते पडली.
५) खामगाव मतदार संघ – भाजपच्या आकाश फुंडकर यांना ९० हजार १६७ मते मिळाली. तर काँग्रेसच्या ज्ञानेश्वर पाटील यांना ७३ हजार ४६४ मते मिळाली. वंचितचे उमेदवार शरद वसतकर यांना २५ हजार ८३९ मते मिळाली.
६) अकोट मतदारसंघ – भाजपच्या प्रकाश भारसाखळे यांना ४८ हजार २९९ मते मिळाली तर काँग्रेसच्या संजय बोडखे यांना २७ हजार ५०१ मते मिळाली. वंचितचे उमेदवार अॅड. संतोष राहाटे यांना ४१ हजार १३९ मते मिळाली.
७) बाळापूर मतदारसंघ – शिवसेनेच्या नितीनकुमार टाले यांना ६८ हजार ९४५ मते मिळाली. वंचितचे धैर्यवर्धन पुंडकर यांना ५० हजार २८४ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या संग्राम गावंडे यांना केवळ १६ हजार ३२९ मते मिळाली.
८) अकोला मतदारसंघ – भाजपच्या गोवर्धन शर्मा यांना ७२ हजार ८३८ मते मिळाली. राष्ट्रवादीचे साजीद खान यांना ७० हजार मते मिळाली. तर वंचितच्या मदन भारगड यांना २० हजार मते मिळाली.
९) अकोला पूर्व मतदारसंघ – भाजपच्या रणधीर सावरकर यांना ९९ हजार ७५८ मते मिळाली. तर वंचितचे उमेदवार हरिदास भदे यांना ७५ हजार २६३ मते मिळाली. काँग्रेसच्या विवेक पारसकर यांना ९ हजार ४४४ मते मिळाली.
१०) मुर्तीजापुर मतदारसंघ – भाजपच्या हरिश पिंपळे यांना ५९ हजार २४० मते मिळाली तर वंचितच्या प्रतिभा अवचार यांना ५७ हजार ३९९ मते मिळाली. काँग्रेसच्या उमेदवाराला या ठिकाणी ४० हजार ८४९ मते मिळाली.
११) वाशिम मतदारसंघ – भाजपच्या लखन मलिक यांना ६५ हजार ६४१ मते मिळाली तर वंचितच्या सिद्धार्थ देओले यांना ५२ हजार ५० मते मिळाली. काँग्रेसच्या रजनी राठोड यांना ३० हजार ४९३ मते मिळाली.
१२) धामनगाव रेल्वे मतदारसंघात – भाजपच्या प्रताप अडसाड यांना ९० हजार ३९३ मते मिळाली. तर काँग्रेसच्या वीरेंद्र जगताप यांना ८० हजार ९७८ मते मिळाली. वंचितच्या निलेश विश्वकर्मा यांना २३ हजार ७०० मते मिळाली.
१३) नागपूर दक्षिण मतदारसंघात – काँग्रेसच्या गिरीश पांडव यांना ७९ हजार ८८७ मते मिळाली. भाजपच्या मोहन मते यांना ८३ हजार ८७४ मते मिळाली तर वंचितच्या रमेश पिसे यांना ५ हजार ५३५ मते मिळाली.
१४) बल्लाळपूर मतदार संघ – भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांना ८५ हजार ६९७ मते मिळाली तर काँग्रेसच्या डॉ. विश्वास झाडे यांना ५२ हजार ६१९ मते मिळाली. वंचितच्या ३९ हजार ७७९ मते मिळाली.
१५) चिमुर मतदारसंघ – बंटी भांगडिया यांना ८६ हजार ८५२ मते मिळाली. काँग्रेसच्या सतीश वारजूकर यांना ७७ हजार १४६ मते मिळाली तर वंचितच्या अरविंद सांडेकर यांना २४ हजार ३८४ मते मिळाली.
१६) राळेगाव मतदारसंघ – भाजपच्या अशोक उईके यांना ९० हजार ५३० मते मिळाली. काँग्रेसच्या वसंत पुरके यांना ८० हजार ७०६ मते तर वंचितच्या माधव कोहाले यांना १० हजार ६८२ मते मिळाली.
१७) यवतमाळ मतदारसंघ – भाजपच्या मदन येरावार यांना ७९ हजार ९१३ मते मिळाली. काँग्रेसच्या अनील मंगळुरकर यांना ७७ हजार २७८ मते मिळाली तर वंचितच्या योगश पारवेकर यांना ७ हजार ८१२ मते मिळाली.
१८) अर्णी मतदारसंघ – भाजपच्या डॉ. संदीप धुर्वे यांना ८१ हजार २४८ मते मिळाली. काँग्रेसच्या शिवाजीराव मोघे यांना ७८ हजार ८९ मिळाली तर वंचितच्या निरंजन मसराम यांना १२ हजार २५३ मते मिळाली.
१९) किनवट मतदारसंघ – भाजपच्या भीमराव केराम यांना ८८ हजार ९७८ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदीप जाधव यांना ७५ हजार ८६४ मते मिळाली तर वंचितच्या प्रा. हेमराज उईके यांना ११ हजार ६३९ मते मिळाली.
२०) नांदेड उत्तर मतदारसंघ -शिवसेनेचे बाजाली कल्याणकर यांना ६१ हजार ९३४ मते मिळाली. काँग्रेसच्या डीपी. सावंत यांनी ४९ हजार ९१६ मते मिळाली तर वंचितच्या मुकुंदराव चावरे यांना २६ हजार ३७६ मते मिळाली.
२१) जिंतूर मतदारसंघ – भाजपच्या मेघना बोर्डीकर यांना १ लाख १६ हजार १४६ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या विजय भांबळे यांना १ लाख १२ हजार ५९७ मते मिळाली तर वंचितच्या मनोहर वाकळे यांना १३ हजार १०७ मते मिळाली.
२२) फुलंब्री मतदारसंघ – भाजपच्या हरिभाऊ बागडे यांना १ लाख ५ हजार ७५५ मते मिळाली. काँग्रेसच्या डॉ. कल्याण काळे यांना ९० हजार ५६० तर वंचितच्या जगन्नाथ रिठे यांना १५ हजार १९९ मते मिळाली.
२३) पैठण मतदारसंघ – शिवसेनेच्या संदीपान भुमरे यांना ८३ हजार ६१ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या दत्तात्रय गोर्डे यांना ६८ हजार ९८७ मते तर वंचितच्या विजय चव्हाण यांना २० हजार ५६४ मते मिळाली.
२४) उल्हासनग मतदारसंघ – भाजपच्या कुमार आयलानी यांना ४३ हजार ५७७ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांना ४१ हजार ६३१ मते मिळाली तर वंचितच्या साजन सिंग यांना ५ हजार ६७७ मते मिळाली.