चंद्रपूर : बहुजननामा ऑनलाइन – एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चिमूर अंतर्गत ब्रह्मपुरी, नागभीड, चिमूर, वरोरा व भद्रावती या पाच तालुक्यातील इयत्ता पहिली ते दुसरीमध्ये प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी शाळेत प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक पालकांनी २८ फेब्रुवारीपर्यंत आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावे असे आवाहन प्रकल्प अधिकारी केशव बावणकर यांनी केले आहे.
या योजनेचा लाभ घेणारा लाभार्थी हा अनुसूचित जमाती प्रवर्गातील रहिवासी असावा, सक्षम अधिकाऱ्याने दिलेले अनुसूचित जमातीच्या दाखल्याची सांक्षाकित प्रत, १ लाखापर्यंतचा उत्पन्नाचा दाखला. पालक दारिद्र्यरेषेखाली कुटुंबातील असेल तर त्याचे पत्र, विद्याथ्र्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, दुसरी प्रवेश घ्यावयाचा असेल तर पहिलीची गुणपत्रिका आदी कागदपत्र प्रवेशअर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. खोटी माहिती सादर केल्यास कोणत्याही वेळी प्रवेश रद्द करण्यात येणार आहे. शाळा निवडीबाबत कोणताही अर्ज करता येणार नाही. आदिम जमातीच्या विद्याथ्र्याची तसेच विधवा, घटस्फोटीत, निराधार, परितक्त्या, अपंग व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची प्राधानान्ये निवड करण्यात येणार आहे, असेही प्रकल्प अधिकारी बावनकर यांनी कळविले आहे.