नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI Cards चा शेअर लिस्टिंगवेळी (सूचीबद्ध) 661 रुपये होता. पण 16 मार्च, 2020 पासून आत्तापर्यंत कंपनीचा शेअर 62.93 टक्क्यांनी वाढला आहे. 2021 च्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत शेअरच्या किमती सुमारे 27 टक्क्यांनी भक्कम झाल्या आहेत. या 9 महिन्यात SBI Cards ने 120 टक्के रिटर्न दिला आहे. SBI Cards अँड पेमेंट सर्व्हिसेसचा बाजार भांडवल (M-Cap) 1.01 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तसेच त्याची पॅरेंट कंपनी ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ (SBI)चा बाजारमूल्य सुमारे 27 टक्के असून, SBI चा बाजार मूल्य सुमारे 3.7 लाख कोटी रुपयांपर्यंत गेला आहे.
तसेच SBI Cards चा शेअर सेंसेक्सवर 37 व्या स्थानी आहे. त्याने टाटा मोटर्स, श्रीसीमेंट आणि JSWU स्टीलसारख्या कंपन्यांचे शेअरला मागे टाकले. SBI Cards चा शेअर लिस्टेट (सूचीबद्ध) होण्यावर 661 रुपये होता. त्यानंतर 22 मे, 2020 ला 495.25 च्या किमान स्तरावर गेला. मात्र, त्यानंतर त्याचा शेअर सातत्याने वाढत आहे. गुरूवारी सेंसेक्सवर हा 1,076.95 रुपये प्रतिशेअरवर बंद झाला.
SBI Cards भारताची एकमेव लिस्टेट कंपनी
SBI Cards ही देशातील एकमेव लिस्टेट कंपनी आहे. कोरोना काळात ऑक्टोबर-डिसेंबर 2020 या तिमाहीत कंपनीने 2540 कोटी रुपयांची कमाई केली. 2019 च्या तिमाहीत कंपनीची कमाई 2,563 कोटी रुपये होती.