पुणे : बहुजननामा ऑनलाईन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असून एम.फिल व पीएच.डी प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक शैक्षणिक प्रवेश विभागाने आज प्रसिद्ध केले. त्यानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात आजपासून (दि.25) सुरू होत आहे.
या अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा ७ जुलै रोजी होत आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करावयाचे आहे. प्रवेशप्रक्रिया दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रवेश परीक्षेतून उत्तीर्ण विद्यार्थी पात्र ठरतील. त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखतीतून एम.फिल व पीएचडीसाठी प्रवेश निश्चिती होईल.
याबाबतची सविस्तर प्रश्नपत्रिकेची रुपरेषा विद्यापीठाने जाहीर केली आहे. पीएचडी व एम.फिल अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एकूण १०० गुणांची परीक्षा असेल. वस्तूनिष्ठ स्वरुपात परीक्षेचे स्वरुप असून या परीक्षेचा कालावधी दोन तासांचा राहील. पीएच.डी. प्रवेशाच्या २३०० तर एम.फिलच्या १९० जागा रिक्त आहेत. पीएच.डी व एम.फिल. प्रवेशासाठी सेट/नेट परीक्षा उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना थेट मुलाखत देता येते. सेट अथवा नेट नसलेल्या उमेदवारांना मात्र विद्यापीठाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच मुलाखत देता येणार आहे.
अधिक माहिती खालील वेबसाईटवर
http://bcud.unipune.ac.in/phd_entrance/applicant/login.aspx