अकोला : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य यांच्यावतीने कालिदास कला मंदिर नाशिक येथे गजानन भटकर यांना संत रविदास महाराज पुस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी झालेल्या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय मंत्री ना. राजकुमार बोडोले, शारदा बडोले, केद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले, सामाजिक राज्य मंत्री ना. दिलीप कांबळे. आ. भाई गिरकर, आ. सीमा हिरे. आ. देवयानी फरांदे. आ. योगेश घोलप, मा. मंत्री बबनराव घोलप, महाराष्ट्रचे सामाजिक मुख्य सचिव दिनेश वाघमारे, महाराष्ट्र आयुक्त शंभरकर, पुणे विभाग आयुक्त वीर आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात चर्मकार समाजाला संत रविदास पुरस्कार बबनराव घोलप यांच्या शिफारशीवरुन महाराष्ट्र व्यक्तिगत ११ पुरस्कार व अकोला जिल्ह्याला सामाजिक संघटना म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघ अकोला जिल्हा यांना पुरस्कार वितरित करण्यात आला.
संत रविदास पुरस्कार २०१८-१९ या पुरस्कार सोहळ्यामध्ये गजानन भटकर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित रामभाऊ उंबरकर, प्रकाश ठोंबरे, सनील गवई, प्रवीण चोपडे, राधेश्याम कळस्कार, शिवलाल इंगळे, संतोष इंगळे, नीलेश बोरकर, सुमीत पानझाडे, छोटू डांगे, गजानन नाचणे हे उपस्थित होते. गजानन भटकर यांना महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागाच्यावतीने संत रविदास समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबदल जिल्ह्यातील राष्ट्रीय चर्मकार महासंघ, जिल्हा पदाधिकारी व शहर पदाधीकारी, ज्येष्ठ नागरिक आघाडी, युवक आघाडी, गटाई कामगार, जिल्हा महिला पदाधिकारी, शहर महिला पदाधिकारी, मित्र परिवार आदींनी त्याचे कौतुक केले. प्रास्ताविक दिनेश वाघमारे, संचालन रेणुका देशकर यांनी, तर आभार शंभरकर व संजय गव्हांदे यांनी केले.