Sanjay Raut | न्यायालयाच्या निकालानंतर संजय राऊत भाऊक

Sanjay Raut | i was kept in an egg cell in prison lost 10 kg sanjay raut told about the incident in the jail

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन  शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांना गोरेगाव पत्राचाळ भूखंड गैरव्यवहार प्रकरणात विशेष पीएमएलए (Prevention of Money Laundering Act) न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयात त्यांच्या जामीनाला मंजुरी मिळाल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला पण संजय राऊत (Sanjay Raut) यांना थोडा वेळ काय निकाल लागला हे कळले नाही. ते भाऊक झाले होते. त्यानंतर त्यांच्या वकिलांनी त्यांना जामीन मिळाल्याचे सांगितले तेव्हा सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

विशेष पीएमएलए न्यायालयात संजय राऊत यांच्यावर ईडीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयात संजय राऊत यांचे कुटुंबिय उपस्थित होते. संजय राऊत सुटकेनंतर सर्वांना भेटले. यावेळी त्यांनी न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास आहे, असे म्हंटले. तसेच मी आता पुन्हा लढणार आहे. आणि कामाला सुरुवात करणार आहे, असे देखील संजय राऊत म्हणाले आहेत.

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील संजय राऊत यांना अभिनंदनासाठी फोन केला होता. संजय राऊत यांना जून महिन्यात सक्तवसुली संचलनालयाने अटक केली होती. त्यांच्यावर आणि त्यांचे बंधू प्रवीण राऊत यांच्यावर गोरेगाव पत्राचाळ भूखंड गैरव्यवहाराचे आरोप ठेवण्यात आले होते. गेले 102 दिवस राऊत तुरुंगात होते. आज त्यांना जामीन मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

 

संजय राऊत यांच्या जामीन अर्जाला स्थगिती मिळावी, अशी मागणी सक्तवसुली संचलनालयाने
(Enforcement Directorate) न्यायालयात केली होती. पण न्यायालयाने ही मागणी फेटाळत राऊतांचा
जामीन अर्ज मंजूर केला आहे. त्यामुळे राऊत यांची आजच (दि. 09) सुटका होणार आहे. संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाने जल्लोष केला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

दरम्यान शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राऊतांच्या सुटकेवर प्रतिक्रिया
दिली आहे. आज आमच्यासाठी दिवाळीचा सण आहे. शिवसैनिकांमध्ये हजार हत्तींचे बळ आज आले आहे.
आजचा दिवस सर्वांसाठी महत्वाचा आहे. आमचा सेनापती परत आला आहे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

 

 

Web Title :- Sanjay Raut | shivsena mp sanjay raut gets bail know his first reaction from pmla court

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | ED ला न्यायालयाचा दणका, संजय राऊतांच्या जामिनाच्या स्थगितीची मागणी फेटाळली; होणार आजच सुटका

MP Sanjay Raut | सावधान रहो शेर आ रहा है, संजय राऊतांच्या जामीनानंतर भास्कर जाधवांचे विरोधकांना खुले चॅलेंज

Bindi Controversy | अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने टिकली प्रकरणावर केली ‘ही’ पोस्ट, सोशल मीडियावर होत आहे व्हायरल