मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थाळाला अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत. यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली होती. हातातील खंजीर खाली ठेवा आणि नंतर अभिवादन करायला जा, असा सल्ला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला होता. त्यांना आता ठाण्याचे शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार बाजूला ठेवण्यासाठी प्रेरणा संजय राऊतांना कुठून मिळाली, ते आधी त्यांनी सांगावे, असे नरेश म्हस्के (Naresh Mhaske) म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सत्तेसाठी आणि खुर्ची साठी शिवसेनेने बाळासाहेबांच्या विचारांना बाजुला सारले. त्यांनीच सर्वप्रथम बाळासाहेबांच्या विचारांवर खंजीर चालविला. केवळ सत्तेसाठी त्यांनी काँग्रेस (INC) आणि राष्ट्रवादीसोबत (NCP) आघाडी केली आहे. बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसला बाजुला ठेवण्याचा प्रयत्न केला. पण शिवसेनेने काँग्रेसला जवळ केले. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासोबत आता आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यात्रा करत आहेत. बाळासाहेबांना अटक करून तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न करणाऱ्या छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्यासोबत ज्यांनी मातोश्रीवर जेवणावळी झाडल्या, ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्ववादी विचारांना कायमची मूठमाती दिली त्यांनाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीवर डोके ठेवण्याचा अधिकार नाही, असे यावेळी नरेश म्हस्के (Naresh Mhaske) म्हणाले. (Sanjay Raut)
त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांवर खंजीर कोणी चालविला, हे आधी संजय राऊत यांनी सांगावे.
बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच करत
आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल वाटेल ते बोलण्याचा नैतिक अधिकार आपल्याला नाही, असेही म्हस्के यावेळी म्हणाले.
Web Title :- Sanjay Raut | ‘Sanjay Raut should first answer who cheated with Balasaheb’s ideas for power’ – Naresh Mhaske
हे देखील वाचा :
MP Sunil Tatkare | खासदार सुनील तटकरे यांचा शिंदे गट आणि भाजपाला टोला; “बालहट्ट पूर्ण केला पाहिजे…”
Devendra Fadnavis | ‘शिवसेनेच्या ‘त्या’ गोष्टीचे अजूनही मनात शल्य आहे’ – देवेंद्र फडणवीस
CNG Price Hike In Pune | महागाईचा मारा कायम, पुण्यात सीएनजी दर पुन्हा वाढले