बहुजननामा ऑनलाईन – टीम इंडियातील कॅप्टन लोकांचं कार बद्दलचं प्रेम सर्वांनाच माहित आहे. त्यांच्याकडे एकापेक्षा एक लग्झरी गाड्या आहेत. आज आपण कॅप्टन राहिलेल्या खेळाडूंपैकी कुणाकडे कोणत्या कार आहेत याची माहिती घेणार आहोत.
1) सुनील गावसकर – भारतीय क्रिकेट संघातील स्फोटक फलंदाज व कॅप्टन राहिलेल्या सुनील गावसकर कडे अनेक कार आहेत. परंतु ते अनेकदा BMW 5 – Series कार मध्ये येताना जाताना दिसतात.
2) सचिन तेंडुलकर – सचिनकडे BMW i8, BMW X6M, BMW M5, BMW M3 सोबत BMW च्या अनेक कार आहेत. त्याच्याकडे Ferrari 360 Modena आणि Mercedes-Benz C63 AMG सुद्धा आहे.
3) कपिल देव – कपिल कडे अनेक लग्झरी कार आहेत. परंतु त्यांच्याकडे जी सर्वात आलिशान कार आहे ती आहे Porsche Panamera.
4) मोहम्मद अजहरुद्दीन – मोहम्मद कडे BMW 5 – Series, Audi Q7, Honda CR-V आणि BMW 640i कार आहे.
5) सौरव गांगुली – सौरव कडे फोर्ड एंडेवर, मर्सिडीज बेंज, सीएलके, होंडा सिटी आणि मर्सिडीज बेंज सी क्लास कार आहे.
6) राहुल द्रविड – राहुलकडे ऑडी क्यु 5 आणि बीएमडब्ल्यू 5 सीरिज, ह्युंडाई ची टक्सन कार आहे.
7) वीरेंद्र सहवाग – वीरेंद्र कडे शानदार बेंटले कॉन्टिनेंटल सोबतच बीएमडब्ल्यू 7 सीरिज कार आहे.
8) अनिल कुंबळे – अनिल कडे फोर्डची एंडेवर आणि मर्सिडीज बेंज ई क्लास आहे. ते नेहमी याच गाड्यांमधून फिरताना दिसतात.
9) महेंद्रसिंह धोनी – धोनीला दुचाकीचा जास्त छंद असला तरी त्याच्याकडे कारचं कलेक्शन देखील आहे. धोनीकडे हमर, लँड रोवर फ्रीलँडर 2, ऑडी क्यु 7, पजेरो पासून तर टोयोटा कोरोला पर्यंत अनेक शानदार गाड्या आहेत.
10) विराट कोहली – विराटकडे ऑडी आर 8, ऑडी ए 6 स्पोर्ट सलून आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये टोयोटा आणि फॉर्चुनर देखील आहे.