इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ धनगर समाजाच्यावतीने दिवसभर ठिय्या देऊन आंदोलन करण्यात आले. ‘धनगर’ व ‘धनगड’ हे दोन्ही शब्द एकच असले, तरी महाराष्ट्रातील धनगर समाज एनटीमध्ये टाकण्यात आला. त्याचवेळी उर्वरीत राज्यातील धनगड समाजाचा समावेश मात्र अनुसूचित जमाती (एसटी)मध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे आता हा संभ्रम दूर करुन धनगर समाजालाही आरक्षणाचा लाभ द्यावा, याशिवाय समाजाच्या इतरही मागण्या पूर्ण करण्याच्या मागण्यांसाठी धनगर समाज आक्रमक झालेला दिसून आला.
सन २०१४ मध्ये भाजपाने निवडणूक लक्षात घेता धनगरांना आरक्षण देण्याचे आश्वासन दिले; परंतु अद्याप आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाला नाही. त्यामुळे आंदोलनातील प्रत्येक समाजबांधवाने रोष व्यक्त केला. विशेष म्हणजे यावेळी सुशिक्षित व ज्येष्ठ मंडळींच्या तुलनेत तरुण-तरुणी, शालेय विद्यार्थिनी व गावकुसातील काही वृद्धांनीच भाषणे दिली. अत्यंत तडाखेबाज शब्दांमध्ये त्यांनी सरकारसह आपल्याच समाजातील नेत्यांनाही फटकारले. यामध्ये पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांना लक्ष्य करण्यात आले.
तरुण पिढीतील समाजाबद्दलचा कळवळा व आक्रमकपणा पाहून आंदोलनस्थळी भेटी देणाऱ्या अन्य नेत्यांनीही त्यांचे कौतुक केले. भाषण देणाऱ्यांमध्ये संजय राज कोकरे, सृष्टी नवले, किरण साव, प्राची पुनसे, ऋतुजा अवघड, स्नेहा नवले, अशोक थोरात, मेंढपाळ महिला सुलभा शिंदे आदींचा समावेश होता. यावेळी धनगर समाजाचे नेते तथा भाजपाचे खा. विकास महात्मे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संतोष महात्मे तसेच मेघश्याम करडे, जानराव कोकरे, राजेंद्र म्हस्के, माधुरी ढवळे, प्रेमा लव्हाळे, सुभाष गोहत्रे, ज्ञानेश्वर ढोमणे, अरुण बांबल, ॲड. विश्वास काळे, सुरेश ढवळे, डॉ. विक्रांत गंधे, श्याम बोबडे, प्रकाश बोबडे आदी उपस्थित होते.