इंदापूर : बहुजननामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – पूणे जिल्हा परिषद राष्ट्रिय आरोग्य अभियान अंतर्गत सन २०१९-२० या वर्षासाठी इंदापूर तालुक्यातील १४ आरोग्यवर्धीनी उपकेंद्रांच्या नुतणीकरण व दुरूस्तीसाठी ८० लाख ५० हजार व १ आरोग्यवर्धीनी केंद्रासाठी ३ लाख २५ हजार रूपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती पूणे जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने यांनी इंदापूर येथे बोलताना दिली.
आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पूणे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व २५ प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे रूपांतर आरोग्यवर्धीनी केंद्र व उपकेंद्रामध्ये करण्यास माण्यता मिळाली असुन या केंद्राच्या माध्यमातुन विविध प्रकारच्या १३ आरोग्यसेवा पुरविण्यात येत असुन वैद्यकिय अधिकारी, आरोग्यसेविका, बहुउद्देशिय आरोग्य सेवक, आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातुन आरोग्यवर्धीनी केंद्रामध्ये व त्याअंतर्गत येणार्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य सुविधा बळकटीकरणाचा आपला मानस असुन या केंद्रामध्ये रूग्णांना प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक आरोग्य सेवा, औषधोपचार, व प्रयोगशालेय तपासणी मोफत दीली जात असल्याची माहीती प्रविण माने यांनी दीली.
इंदापूर तालुक्यातील पुढील गावातील आरोग्यवर्धीनी केंद्र व उपकेंद्रांना निधी मंजूर झाला आहे. भांडगाव (बावडा) उपकेंद्र दुरूस्ती व नुतणीकरण ३ लाख २५ हजार रूपये तर काझड, निरनिमगाव, सराटी (बावडा), शहाजीनगर, सुरवड (बावडा), वडापूरी, डाळज नं१, निरगुडे, कचरवाडी, अकोले, रणगाव, न्हावी (निरवांगी), अशोकनगर बावडा, या १३ उपकेंद्रांना नुतणिकरण व दुरूस्तीसाठी प्रत्येकी ५ लाख ७५ हजार रूपये निधी मंजूर झाला आहे. आणी बावडा येथिल आरोग्यवर्धीनी केंद्राची दुरूस्ती व नुतणीकरणासाठी ३ लाख ७५ हजार रूपये निधी मंजूर झाला असल्याची माहीती पूणे जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने यांनी दीली.