अमरावती : बहुजननामा ऑनलाईन – ईव्हीएम दोषपुर्ण असल्याचा दावा करत विदर्भातील खासदारांच्या निवडीविरोधात याचिका दाखल झाल्यानंतर आता अमरावतीमधून निवडून आलेल्या खासदार नवनीत राणा यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या दोन स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
कोणी दाखल केल्या याचिका ?
नवनीत राणा यांनी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा लोकसभा निवडणूकीत पराभव करत विजय मिळवला. त्यांच्या निवडीला शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव आडसूळ आणि सुनील भालेराव या दोघांनी आव्हान देणाऱ्या दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत.
काय आहे आक्षेप ?
अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसुचित जातींसाठी राखीव होता. नवनीत कौर राणा यांनी निवडणूकीसाठी लुभाणा आरक्षणातून अर्ज भरला होता. त्यानंतर त्या विजयी झाल्या. राणा यांनी असे केल्याने मागासवर्गीय समाजाचा संवैधानिक अधिकार हिरावून घेतला आहे. त्यामुळे त्यांची निवड रद्द ठरवावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.