बहुजननामा ऑनलाइन टीम – दिग्गज टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे (Reliance Jio)आपल्या ग्राहकांसाठी आवश्यकतेनुसार विविध कॅटेगरीतील प्रीपेड प्लॅन उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला जिओकडे असलेल्या 400 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या दोन प्रीपेड प्लॅनबाबत माहिती देणार आहेत. या दोन्ही प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 जीबी डेटा मिळतो. यातील एका प्लॅनमध्ये दररोज 3 जीबी डेटा ग्राहकांना मिळतो, तर दुसरा प्लॅन दुप्पट व्हॅलिडिटीसह येतो.
399 रुपयांचा प्लॅन
जिओचा हा दररोज 1.5 जीबी डेटा देणारा प्लॅन आहे. 399 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 56 दिवसांची वैधता मिळणार आहे. म्हणजे एकूण 84 जीबी डेटा ग्राहकांना वापरण्यास मिळतो. याशिवाय कॉलिंगसाठी युजर्सना जिओच्या नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 2000 नॉन-जिओ मिनिटे मिळतात. तसेच, दररोज 100 एसएमएस आणि जिओ अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शनही मिळेल.
349 रुपयांचा प्लॅन :-
जिओच्या 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये केवळ 28 दिवस व्हॅलिडिटी मिळेल. पण यामध्ये ग्राहकांना दररोज 3 जीबी डेटा मिळतो. म्हणजे 28 दिवसांमध्ये एकूण 84 जीबी डेटा ग्राहक वापरु शकतात. यामध्ये युजर्सना जिओच्या नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1000 नॉन-जिओ मिनिटे मिळतात. याशिवाय दररोज 100 एसएमएस आणि जिओ अॅप्सच मोफत सबस्क्रिप्शनही मिळणारआहे.
कोणता प्लॅन फायद्याचा सर्वोत्तम ?
जर तुम्ही इंटरनेटचा जास्त वापर करत असाल तर तुमच्यासाठी 349 रुपयांचा प्लॅन उत्तम पर्याय ठरु शकतो. कारण यामध्ये दररोज 3 जीबी डेटा मिळतो. पण जर डेटासोबतच तुम्हाला वैधताही पाहिजे असेल तर 399 रुपयांचा प्लॅन चांगला पर्याय आहे.