नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने ग्राहकांसाठी एक आकर्षक प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे यात 30 दिवसांची व्हॅलिडिटी फक्त 75 रुपयांमध्ये मिळते. शिवाय, लोकल आणि इंटरनॅशनलसाठी 200 मिनिटांचे व्हॉइस कॉलिंग आहे. तसेच, बीएसएनएल आणखी एका प्लॅनमध्ये 75 जीबी डेटा देत आहे. या प्लॅनबाबत जाणून घेवूया. (BSNL)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
BSNL 75 रुपयांचा प्लॅन
बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये डेटा, कॉलिंग आणि इतर बेनिफिट्स आहेत. यात 30 दिवसांची व्हॅलिडिटी असून व्हॉईस कॉलिंगसाठी 200 मिनिटे आणि 2 जीबी डेटा मिळतो. मोफत कॉलरट्यूनची सुविधा आहे.
BSNL 75 जीबी डेटा प्लॅन
बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये युजर्सना दरमहा 75 जीबी डेटा दिला जातो. या प्लॅनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात 300 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.
या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसह यूजर्सना दररोज 100 एसएमएस मोफत मिळतात.
तसेच, युजर्सना दर महिन्याला 75 जीबी डेटा मिळतो. डेटा आधीच संपला, तर इंटरनेटचा वेग 40 केबीपीएस होतो.
महत्वाचे म्हणजे यामध्ये 60 दिवसांसाठी 75 जीबी डेटा मिळणार आहे. यानंतर युजर्सना अन्य प्लॅनने रिचार्ज करावे लागेल.
Web Title :- BSNL | bsnl launches rs 75 very good plan will get 30 days validity know details
हे देखील वाचा :
Dasara Melava 2022 | शिंदे गट हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाणार!