नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाने न्यूमोनिया रोगासाठी पहिली स्वदेशी लस विकसित केली आहे, जी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन पुढील आठवड्यात लाँच करू शकतात आणि यानंतर ती बाजारात उपलब्ध होईल. सूत्रांनी सांगितले की, ही लस सध्या दोन परदेशी कंपन्यांकडून उपलब्ध करून दिल्या जाणार्या लसीपेक्षा खुप स्वस्त असेल.
भारताच्या औषध नियंत्रकांनी पुणे येथील संस्थेकडून प्राप्त लसीच्या क्लिनिकल ट्रायलच्या पहिल्या, दुसर्या आणि तिसर्या टप्प्याच्या आकड्यांचे पुनरावलोकन केल्यानंतर जुलैमध्येच लस ‘न्यूमोकोकल पॉलीसॅक्राइड कांजुगेट’ ला बाजारात आणण्याची परवानगी दिली होती.
आरोग्य मंत्रालयाने यापूर्वी सांगितले होते की, लसीच्या माध्यमातून बालकांमध्ये ‘स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनिया’ द्वारे होणार्या आजारावर रोगप्रतिकारशक्ती वाढवली जाते. सीरम इन्स्टीट्यूटने लसीचे पहिल्या, दुसर्या आणि तिसर्या टप्प्याची क्लिनिकल ट्रायल भारत आणि अफ्रीकन राष्ट्र गाम्बियामध्ये केली आहे.
अधिकृत सूत्रांनी सांगितले की, न्यूमोनियाच्या क्षेत्रात ही स्वदेशात विकसित पहिली लस आहे. सूत्रांनी सांगितले की, ही लस फायजरच्या एनवायएसई:पीएफई आणि ग्लॅक्सोस्मिथक्लाइनच्या एलएसई:जीएसकेच्या तुलनेत जास्त स्वस्त असेल.