बहुजननामा ऑनलाइन – Ramraje Naik Nimbalkar | विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती बिघडल्याने सोमवारी (8 नोव्हेंबर) रोजी मध्यरात्री रामराजे नाईक निंबाळकर यांना पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ताप वाढल्याने रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांना अस्वस्थ वाटू लागले होते. मंगळवारी सकाळपर्यंत रामराजेंना बरे वाटू लागले असून सायंकाळपर्यंत घरी सोडतील, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. दरम्यान, साेमवारी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) यांनी फलटण येथे जाऊन रामराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतली. आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी दाेघांमध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अनुषंगाने गोपनीय बैठक झाली हाेती.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, सध्या सेनापती बापट रस्त्यावरील (senapati bapat road) लोकमान्य हॉस्पिटलमध्ये (lokmanya hospital) उपचार सुरू आहेत. दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचे उमेदवार ठरविण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. मंगळवारी होणाऱ्या या बैठकीत अंतिम निर्णय होईल, जागावाटप देखील करायचे आहे. याबाबतचा निर्णय घेण्यात येणार होता. मात्र, रामराजे हे रुग्णालयात असल्याने या बैठकीत निर्णय होईल का नाही याबाबत संभ्रम आहे.
web title: Ramraje naik nimbalkar ramraje naik nimbalkar hospitalized in lokmanya hospital senapati bapat road due ill health pune.
PUC Certificate | गाडीमध्ये ‘PUC’ सर्टिफिकेट नसेल तर भरावा लागले 10 हजारांचा दंड; जाणून घ्या नियम