बहुजननामा ऑनलाईन – गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) तिच्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत आहे. नुकताच तिने पती आदिल खानच्या अफेअरमुळे त्यावर गुन्हा दाखल करत फसवणूक व मारहाण केल्याचा आरोप केला आहे. तर आता पुन्हा राखीने (Rakhi Sawant) पती आदिल वर गंभीर आरोप केले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुन्हा एकदा राखीचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये राखी आदिलवर गंभीर आरोप करताना दिसत आहे. बिग बॉस मराठी च्या घरात असताना राखी गरोदर असल्याचे बोलले जात होते. आता याबाबत खुलासा करत गर्भपात झाल्याचाही तिने सांगितले आहे. यावेळी बोलताना राखी म्हणाली “बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच माझा गर्भपात झाला. याबाबत कोणाशी काही बोलू नकोस असे आदिलने मला सांगितले होते. गर्भपात झाल्यानंतर तीन महिने शरीर संबंध ठेवू नका असा डॉक्टरांनी सल्ला दिला होता. मात्र केवळ 10 दिवसातच आदिलने माझ्याबरोबर शरीर संबंध ठेवले होते”.
पुढे बोलताना राखी (Rakhi Sawant) म्हणाली “गर्भपात झाल्यानंतर जर लगेच पुन्हा मी गरोदर राहिले तर माझ्या जीवाला धोका असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. बिग बॉसच्या घरात असतानाही मी गरोदर असल्याचे म्हटलं होते. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर माझी आई आजारी असल्यामुळे माझी धावपळ झाली आणि त्यानंतर मी आदिल बरोबर लग्न केल्याचा खुलासा केला. यावेळी पहिल्यांदा आदिलने हे मान्य केले नव्हते. या सगळ्या तणावामुळेच माझा गर्भपात झाला”.
राखीने आदिल विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर 7 फेब्रुवारी रोजी ओशिवारा पोलिसांनी आदिलला अटक केली.
त्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
तर 16 फेब्रुवारीला पुन्हा आदिलला अंधेरी कोर्टात हजर करण्यात आले होते.
आता आदिलला 20 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Rakhi Sawant | rakhi sawant talk about miscarriage alleged husband adil khan video
हे देखील वाचा :
Sangli Crime News | बिझनेसमध्ये आर्थिक व्यवहारातून झाला वाद; जिवलग मित्रानेच काढला मित्राचा काटा
Parbhani Crime News | 26 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट
Famous Movie | अक्षय नागनाथ गवसाने दिग्दर्शित ‘फेमस’ या चित्रपटाचे पोस्टर रिलीज
Aroh Velankar | आरोह वेलणकरच्या ट्विटने वेधले सर्वांचे लक्ष; म्हणाला आज ‘बाळासाहेब…’