Sangli Crime News | बिझनेसमध्ये आर्थिक व्यवहारातून झाला वाद; जिवलग मित्रानेच काढला मित्राचा काटा

Sangli Crime News | friend finished his friend over a money dispute in valwa taluka in sangli

सांगली : बहुजननामा ऑनलाईन  Sangli Crime News | सांगलीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दूध व्यवसायातल्या आर्थिक वादातून एका मित्राने आपल्या मित्राचीच निर्घृणपणे हत्या केली आहे. हि घटना सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातल्या अहिरवाडी या ठिकाणी घडली आहे. सुरज बाळासाहेब सावंत (वय 25) असं मृत तरुणाचं नाव आहे. तर शरद दुटाळे, असं हत्या करणाऱ्या आरोपी मित्राचे नाव आहे. या प्रकरणी शरद दुटाळे याच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Sangli Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

काय आहे संपूर्ण प्रकरण?
वाळवा तालुक्यातल्या अहिरवाडी या ठिकाणी सुरज सावंत आणि शरद दुटाळे हे दोघे मित्र राहत होते. या दोघांनी काही वर्षांपूर्वी एकत्रित दुधाचा व्यवसाय सुरू केला होता. हा व्यवसाय सुरु झाल्यानंतर दोघांमध्ये आर्थिक गोष्टीतून वाद सुरू झाले. त्यातून मग दोघांनीही स्वतंत्र दूध व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि दोघांनीही गावात दुधाचा स्वतंत्र व्यवसाय सुरु केला. ज्यामध्ये सुरज सावंत या तरुणाने दुधाच्या व्यवसायामध्ये चांगला जम बसवला आणि त्याची प्रगती ही चांगल्या प्रमाणात झाली. तर दुसऱ्या बाजूला शरद दुटाळे याला दूध व्यवसायामध्ये जम बसवता आला नाही आणि त्याचा व्यवसाय डबघाईला आला. त्यामुळे त्याने आपला दुधाचा व्यवसाय बंद केला. मात्र आपल्या मित्राचा व्यवसाय सुरूच आहे याचा राग शरद याच्या मनात खदखदत होता. या रागातून गुरुवारी रात्रीच्या सुमारास शरद याने आपला जीवलग मित्र सुरज याची हत्या केली. (Sangli Crime News)

 

कशाप्रकारे केली हत्या?
सुरज हा घटनेच्या दिवशी सायंकाळी आपल्या दुचाकीवरून गावाजवळच्या असणाऱ्या तुजारपूर या ठिकाणी दूध संकलनासाठी गेला होता. त्यावेळी सुरज हा संभाजी पाटील यांच्या गोठ्याजवळ दूध संकलन करत असताना शरद तिथे पोहचला. यावेळी त्याच्या आर्थिक बाबीच्या मुद्द्यावरून त्याने सुरजसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद नंतर टोकाला गेला आणि रागाच्या भरात शरदने डोक्यात लोखंडी रॉड टाकून सूरजची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच इस्लामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्याचा पंचनामा केला. यानंतर आरोपी शरद दुटाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Sangli Crime News | friend finished his friend over a money dispute in valwa taluka in sangli

 

हे देखील वाचा :

Parbhani Crime News | 26 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

Aroh Velankar | आरोह वेलणकरच्या ट्विटने वेधले सर्वांचे लक्ष; म्हणाला आज ‘बाळासाहेब…’