बहुजननामा ऑनलाईन – Aroh Velankar | गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच गोष्टी घडताना दिसत आहेत. अनेक दिवसांपासून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. तर काल अखेर निवडणूक आयोगाचा निर्णय आला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाले आहे. तर या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्धव ठाकरे यांच्या सह कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. या निकालानंतर सोशल मीडियावर अनेक जण आपले मत व्यक्त करताना दिसत आहेत. यामध्ये अनेक कलाकारांनी देखील आपले मत सोशल मीडियावर व्यक्त केले आहे. (Aroh Velankar)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर निर्णय आल्यानंतर राजकीय क्षेत्रासह मनोरंजनसृष्टीतून अनेक कलाकारांनी यावर भाष्य केले आहे. तर आता मराठी अभिनेता आरोह वेलणकरने देखील ट्विट केले आहे. यावेळी आरोहने ट्विट करत म्हटले की, “‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं अभिनंदन… बाळासाहेबपण खुश असतील आज”. सध्या आरोहच्या या ट्विटवर समिश्र प्रतिक्रिया येत आहेत. तर आरोहच्या या ट्विटने एकच खळबळ माजली आहे. (Aroh Velankar)
Congratulations @mieknathshinde !! बाळासाहेब पण खूष असतील आज…
— Aroh Welankar (@ArohWelankar) February 17, 2023
आरोह सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध गोष्टींवर तो नेहमीच भाष्य करत असतो. आरोह कित्येकदा त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे देखील अडचणीत सापडला आहे. अनेकदा आरोह त्याच्या विधानांमुळे ट्रोल देखील झाला आहे. तरीही आरोह अनेक गोष्टींवर आपले मत मांडत असतो. आरोह वेलणकरने ‘रेगे’ या सिनेमात काम केले आहे. तर नुकताच तो बिग बॉसच्या चौथ्या पर्वात देखील दिसून आला होता. त्यामध्ये त्याने वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. याच पर्वाच्या टॉप 5 मध्ये देखील तो पोहचला होता. पुन्हा एकदा आरोह त्याच्या ट्विट मुळे चर्चेत आला आहे.
Web Title :- Aroh Velankar | aroh welankar react on shiv sena symbol and name got shinde party
हे देखील वाचा :
Kim Kardashian | किम कर्दाशियने एलियन्ससोबत केले फोटोशूट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
Kangana Ranaut On Uddhav Thackeray | शिवसेना गमावल्यानंतर कंगना रणौतची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाली…