Kim Kardashian | किम कर्दाशियने एलियन्ससोबत केले फोटोशूट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
बहुजननामा ऑनलाईन – Kim Kardashian | हॉलीवुड स्टार आणि अभिनेत्री किम कर्दाशियनचा नवा लुक व्हायरल. पुन्हा एकदा किम तिच्या नव्या फोटोशूट मुळे चर्चेत आली आहे. किम तिच्या विविध स्टाईलच्या फोटोमुळे जास्त ओळखली जाते. किमचे स्वतःचे ब्रँड देखील ती नेहमीच प्रमोट करत असते. किमने शेअर केलेल्या फोटोमध्ये एलियन थीम ठेवला आहे. यावेळी किम कर्दाशियनने एलियन सोबत फोटोशूट केले आहे. बिकनी परिधान करून तिने एलियन सोबत हा फोटोशूट केल्यामुळे सध्या सोशल मीडियावर ती चर्चेत आहे. (Kim Kardashian)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
किम नेहमीच तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. किमचा स्वतःचा प्रसिद्ध क्लोथिंग ब्रँड आहे. याच क्लोथिंग ब्रँड साठी तिने हे फोटोशूट केले आहे. या फोटोशूटला हटके टच देण्यासाठी तिने एलियन थीम निवडली आहे. किम या तिच्या ब्रँडच्या नव्या कलेक्शन साठी तिने हे फोटोशूट केले आहे. मॉडेल सोबत किमचे हे नवीन फोटोशूट सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. हे फोटो पाहून आपण कुठल्यातरी वेगळ्या जगात असल्याचा भास नक्कीच होतो हे मात्र खरे. (Kim Kardashian)
किमने तिच्या स्किम्स क्लाथ ब्रांड च्या स्कीम्स कलेक्शनसाठी नवीन स्विम सूट लॉन्च केले आहे.
यावेळी तिने हे फोटोशूट केलेले आहे.
यावेळी फोटोमध्ये दिसत आहे की एलियन प्रमाणे मेकअप केलेले मॉडेल्स तिच्या अवतीभवती दिसत आहेत. तर काही फोटोमध्ये किमच्या बाजूला डमी एलियन्स दिसत आहेत. या बिकनी फोटोशूट मध्ये देखील किम नेहमीप्रमाणे हॉट आणि सेक्सी दिसत आहे. किमने आपली कर्वी फिगर फ्लॅट करत प्रेक्षकांच्या हृदयांचे ठोके चुकवले आहेत.
Web Title :- Kim Kardashian | kim kardashian alien themed bikini photoshoot goes viral skims brand
हे देखील वाचा :
Kangana Ranaut On Uddhav Thackeray | शिवसेना गमावल्यानंतर कंगना रणौतची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाली…
Comments are closed.