बहुजननामा ऑनलाईन – Kangana Ranaut On Uddhav Thackeray | केंद्रीय निवडणूक आयोगाच्या एका निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ झाली असून या निर्णयाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल 17 फेब्रुवारी रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. तसेच निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचे नावदेखील शिंदे गटाला दिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. (Kangana Ranaut On Uddhav Thackeray)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कुकर्म करने से तो देवताओं के राजा इन्द्र भी स्वर्ग से गिर जाया करते हैं, वो तो सिर्फ़ एक नेता है, जब उसने अन्याय पूर्व मेरा घर तोड़ा था, मैं समझ गई थी, ये शीघ्र ही गिरेगा, देवता अच्छे कर्मों से उठ सकते हैं लेकिन स्त्री का अपमान करने वाले नीच मनुष्य नहीं… ये अब कभी उठ नहीं पाएगा।
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 17, 2023
यानंतर सोशल मीडियामध्येही दोन्ही गटातील लोक आपआपल्या नेत्यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. यामध्ये काहींनी शिंदें सरकारची बाजू घेतली तर काहींनी उद्धव ठाकरेंची बाजू मांडली. अशातच अभिनेत्री कंगना राणावत हिने पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे पण सडकून टीका केली आहे. कंगनाने 2021 मध्ये एक ट्वीट केले होते ज्यात तिने म्हंटल होत की, ‘साधूंची हत्या आणि स्त्रीचा अपमान करणाऱ्याचा विनाश निश्चित आहे’. तिचे हेच ट्वीट एका ट्विटर युजरने रीट्वीट करत लिहिले की, ‘तिने आधीच अंदाज बांधला होता, म्हणूनच ती क्वीन आहे’. कंगनाने याच ट्वीटवर कमेंट करत खालील लेटेस्ट ट्वीट केले आहे. (Kangana Ranaut On Uddhav Thackeray)
चाणक्य की बाते कभी गलत नही हो सकती । जमाना कोई भी विधाता एक ही है
— Brand Agency (@brandagency_) February 17, 2023
कंगनाने शेअर केलेल्या ट्वीटमध्ये लिहिले की, ‘वाईट काम केल्यानंतर देवतांच्या राजा इंद्रालादेखील स्वर्गातून खाली
यावं लागलं होत , मग तो तर फक्त एक नेता आहे.
जेव्हा त्याने अन्यायाने माझे घर तोडले, तेव्हाच मी समजून गेले होते की हाही लवकरच पडणार आहे.
चांगले काम करुन देवता पुन्हा वर जाऊ शकतात, पण स्त्रीचा अपमान करणारे लोक कधीच वर उठू शकत नाहीत,
आता तो परत कधीच उठू शकणार नाही’. उद्धव ठाकरेंचं सरकार असताना कंगनाच्या घराचा काही भाग मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाणे पाडला होता.
त्यावेळीदेखील कंगना उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाली होती,
“आज माझं घर पाडलं आहे, उद्या तुमचा गर्व मोडून पडेल. प्रत्येकाची वेळ येते…लक्षात असू द्या”.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Kangana Ranaut On Uddhav Thackeray | uddhav thackeray loses name symbol of shivsena founded by father kangana ranaut on uddhav thackeray shivsena
हे देखील वाचा :
IPL Schedule 2023 | IPLचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी पार पडणार पाहिला आणि अंतिम सामना ?