पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | रहिवासी इमारतीमधील निवासी गाळे हे खासगी कंपनीला भाड्याने दिले. कंपनीने तेथे हॉस्टेल सुरु केले. त्यानंतर मालक व चालक यांच्यात भाड्यावरुन झालेल्या वादातून मालकाने बिल्डींगच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून विद्यार्थ्यांना कोडून ठेवण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
याबाबत लोणी काळभोर पोलिसांनी (Pune Police) स्वत: फिर्याद होत चौघांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. विद्याधर व्यंकटराव वाघधारे, सत्यभामा विद्याधर वाघधरे (दोघे रा. कल्पतरु सोसायटी, महंमदवाडी, हडपसर), केदार किसन चंदनशिव व ओमकार किसन चंदनशिव (दोघे रा. संभाजीनगर,धनकवडी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार लोणी स्टेशन येथील स्टान्झा लिव्हिंग बिल्डिंगमध्ये शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता घडला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिल्डिंग मालकांनी स्टान्झा लिव्हिंग इमारत कोणताही भाडेकरार न करता रहिवासी इमारतीमधील निवासी गाळे डी व्टेल्व स्पेसेस प्रा. लि. या कंपनी हॉस्टेल व्यवसाय चालविण्या करीता दिले. कंपनीने तेथे हॉस्टेल सुरु केले. दरम्यान, कंपनी चालक व इमारतीचे मालक यांच्यात भाडे देण्यावरुन वाद झाला. त्यातून आरोपींनी इमारतीच्या प्रवेशद्वारालाच बाहेरुन कुलूप लावून विद्यार्थ्यांना आत कोंडून ठेवले. पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी विद्यार्थ्याची सुटका केली. पोलीस उपनिरीक्षक तरटे तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | Locked up students in hostels due to owner-driver dispute; Incident at Loni Station
हे देखील वाचा :
Pune Crime News | मुलींच्या वसतीगृहात जाण्यास मनाई केल्याने टोळक्याने दांडक्याने केली मारहाण