नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – राफेल प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज आपले स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये दिले आहे. यावेळी ‘चौकीदार चोर है’ या विधानावर राहुल गांधींनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
https://twitter.com/ANI/status/1120215980850982912
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारात येणाऱ्या विषयांवर ओघात आपण ‘चौकीदार चोर है’ असे शब्द प्रयोग केले, मात्र ते चुकीच्या अर्थाने घेतले गेले असे स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टाला दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने राफेल प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार असल्याचे म्हटले होते हा केंद्र सरकारला मोठा झटका असल्याचे मानले जात होते. यावर बोलताना राहुल गांधी यांनी, आता न्यायालयानेही चौकीदार ही चोर है, यावर शिक्कामोर्तब केले असल्याचे म्हटले होते. याविरोधात भारतीय जनता पक्षाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. यावर आज राहुल गांधी यांनी खेद व्यक्त केला.