पिंपरी बहुजननामा ऑनलाईन – भोपाळ लोकसभा मतदार संघातून भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या प्रज्ञासिंग ठाकूर यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यामध्ये शहिद झालेल्या हेमंत करकरे यांच्याबद्दल अपमान करणारे वक्तव्य केले होते. ज्यांनी देशासाठी व देशाच्या सुरक्षेसाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या शहिदांविषयी प्रज्ञासिंग साध्वी यांनी अपमान करणारे वक्तव्य केले. त्यामुळे देशातील जनता त्यांना कधीच माफ करणार नाही. या साध्वीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांची उमेदवारी भाजपाने रद्द करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.
हेमंत करकरे यांना मी शाप दिला होता त्यांना मारल्यामुळेच माझ सुतक संपले असे साध्वींच वक्तव्य हे देशातील जनतेचा अपमान करणारे आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी प्रज्ञासिंग साध्वी आहे. अन्य ठिकाणच्या बॉम्बस्फोटाचे व दहशतवादी हल्ल्याच्या गटांमध्ये सुद्धा साध्वीचा हात आहे. त्यामुळे साध्वी यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी ब्रिगेडने केली आहे .