पुणे : बहुजननामा ऑनलाईन – सुजय विखे नंतर आता काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे . अहमदनगर येथे भाजप उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत विखेंचा भाजपप्रवेश होण्याची शक्यता आहे.
लोकसभेच्या तोंडावर आघाडीवर नाराज असलेल्या सुजय विखे यांना दक्षिण नगर मतदारसंघातून भाजपकडून तिकीट मिळाले होते .त्यानंतर त्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेत भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभेची उमेदवारी मिळवली. त्यानंतर आता त्यांचे वडील राधाकृष्ण विखे हेदेखील भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याच्या चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी येत्या १५ दिवसात मोठी घोषणा करणार असल्याचे त्यांनी बोलले होते . आता ते भाजप प्रवेश करतील कि नाही याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.