वॉशिंग्टन : बहुजननामा ऑनलाईन – भारताने अमेरिकी उत्पादनांवर कर लावल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पुन्हा संतापले आहेत. भारत हा सर्वाधिक कर लादणारा देश आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. याआधीही ट्रम्प यांनी भारताने अमेरिकेवर लावलेल्या कराबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
पुढे बोलताना ते म्हणाले कि , भारत हा अमेरिकी वस्तूंवर १०० टक्क्यांहून अधिक कर वसूल करत आहे. यावर ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना याबाबत कारवाही करण्याचे आदेश दिले आहेत. भारत हा सर्वाधिक कर लावणारा देश असून त्यांच्या सोबत व्यापर म्हणजे ‘मूर्ख व्यापार’ असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. ट्रम्प यांनी दावा ही केला की, भारत हा ‘टेरिफ किंग’ असून ते अमेरिकेच्या वस्तूंवर भरपूर कर लादतो, पण अमेरिका हा अशा वस्तूंवर भारताकडून कोणतेही कर आकारत नाही, असा दावा ही ट्रम्प यांनी यावेळी केला.
डोनॉल्ड ट्रम्प यावेळी म्हणाले की, भारताकडून लावण्यात येणाऱ्या अधिक कराला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताच्या वस्तूंवर लावण्यात आलेल्या करांच्या निर्णयाला काही सिनेटरांकडून विरोध होत आहे. ते पुढे म्हणाले, चीन नंतर भारत हा दूसरा देश आहे जो अमेरिकेच्या वस्तूंवर मोठा कर वसूल करतो. ट्रम्प यांनी भारतवर हा आरोप केला की, आमच्या सोबत वारंवार असा मूर्ख व्यापर करुन ते अवैध व्यापारचा आधार घेत आहेत. ट्रम्प यांनी अमेरिका सोबतच्या व्यापार असंतुलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार ठरवले आहे. भारताच्या व्यापार आणि कर धोरणावर नाराजी व्यक्त करत म्हणाले, आमचे सिनेटर म्हणतात की तुम्ही असे करु नका, हा मुक्त व्यापार नाही.अशी नाराजी अमिरिकेकडून करण्यात येत आहे .