भोकर येथे प्रा.यशपाल भिंगे प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न
भोकर : (माधव मेकेवाड) बहुजननामा ऑनलाईन – भोकर येथे यशपाल भिंगे प्रचार सभेत बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की,काँग्रेस व भाजपावर टिकचे झोड कायम ठेवली काँग्रेस असो की भाजप असो दोघांचंही राज्य आपण पाहिलं दोघंही एकाच माळीच मनी आहेत असा गंभीर आरोप बाळासाहेब यांनी प्रचार सभेत केला आहे. काँग्रेस वाले सूड होते म्हणून त्यांना आम्ही घालावंलो व भाजपला निवडून दिल ते तर त्यापेक्षा ही अधिक सूड निघाले असा सुद्धा आरोप बाळासाहेब यांनी यावेळी हजारो लोकांसमक्ष बोलले.
राफेल बद्दल भाजप सरकारच भिंग भाषणात बाळासाहेब आंबेडकर यांनी फोडलं भाजप सरकार ही खोटारडी सरकार आहे पुढे त्यांनी नरेंद्र मोदीला असे सुचवले की अगोदर ज्या वर्गात बसले त्याच वर्गात बसायचं असेल तर आम्ही बसवू असे ही बोलले.देशातील अर्थिक व्यवस्था हि बड्या उद्योगपतीच्या फायद्याची ठरत असल्याने सामान्य शेतकर्यांचे कंबरडे मोडले त्यांच्या मालाला आधारभूत किंमत मिळाली पाहिजे त्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे काँग्रेस भाजपा दोन्ही सरकार भ्रष्टाचारी असून बहूजन वंचित आघाडी च्या उमेदवाराला निवडून द्या असे आवाहन अॅड.आंबेडकर यांनी केले आहे.
भोकर येथे मोंढा मैदानात नांदेड लोकसभेचे वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार यशपाल भिंगे यांची प्रचार सभा पार पडली यावेळी ते बोलत होते.प्रचार सभेस धनगर समाजाचे अन्नाराव पाटील,जाकेर चाउस,फेरोज लाला,सूभाष तेले,एल.ए.हिरे,भदरगे आदिची उपस्थिती होती. पूढे बोलताना अॅड.आंबेडकर म्हणाले की,भाजपा व काँग्रेस हे भांडवलदाराचे हित जोपासणारी सरकार आहेत सर्व सामान्यांचे हित पाहिल्या जात नाही असेही ते म्हणाले. लोकसभेचे उमेदवार यशपाल भिंगे बोलताना नांदेड शहरातील बंद पडलेले उद्योग जसे की,एन.टी.सी.मिल पूनश्च सूरु करु त्याच बरोबर नांदेड हे सोलार सिटी,हिस्टाॅरीकल सिटी करत बेरोजगारासाठी चार लाख बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देवू असे ते म्हणाले.फेरोज लाला यांनीही आपले मनोगत व्यक्त केले प्रचार सभेला मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होती.सूत्रसंचलन राजेश चंद्रे तर आभार दशरथ भदरगे यांनी मानले.