पुणे : बहुजननामा ऑनलाईन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने रिफेक्टरीबाबत(भोजनगृह ) नवीन नियमावली तयार केली त्याविरोधात काल विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदाेलन केले आंदाेलनाच्या वेळी विद्यार्थी आणि विद्यापीठाचे सुरक्षारक्षक यांच्यात धक्काबुक्की झाली. विद्यापीठाने आंदाेलन करणाऱ्या १२ विद्यार्थ्यांच्या विराेधात चतुश्रुंगी पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान विद्यापीठाने गुन्हेे तात्काळ मागे घ्यावेत यासाठी विद्यार्थी धरणे आंदाेलन करणार आहेत.
विद्यापीठाने रिफेक्टरीबाबत नवीन नियामावली तयार केली हाेती त्याची अंमलबजावणी १ एप्रिल पासून करण्याची घोषणा केली होती त्यामध्ये एका थाळीत दाेन विद्यार्थ्यांनी जेवू नये तसेच मासिक पास नसलेल्या विद्यार्थी आणि इतरांनी रिफेक्टरीमध्ये न जेवता विद्यापीठातील इतर ठिकाणी असलेल्या कॅन्टिन आणि हाॅस्टेलमध्ये जेवण करावे असे सांगण्यात आले हाेते.विद्यार्थी संख्या अधिक असल्याने त्याचा भार अधिक हाेत असून जेवण चांगल्या दर्जाचे देता यावे यासाठी हे नियम केले असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले हाेते.
त्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप नाेंदवला हाेता. खेड्यातील विद्यार्थ्यांना अनेकदा मासिक पासचे पैसे भरणे शक्य नसल्याने ते एकवेळचे पैसे भरुन जेवण करतात. तर काही विद्यार्थ्यांना एकट्याला थाळी संपवणे शक्य नसल्याने दाेघांमध्ये खात असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे. तसेच ज्यांच्याकडे मासिक पास नाही त्यांना रिफेक्टरी मध्ये येऊ देखील दिले जात नसल्याचा आराेप विद्यार्थ्यांनी केला आहे