भंडारा : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभेच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडी सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींना लक्ष करत जोरदार टीका केली आहे . ‘जो व्यक्ती स्वता:च्या पत्नीला न्याय देऊ शकत नाही तो तुम्हाला काय न्याय देणार’ अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे. भंडाऱ्यातील बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार कारु नान्हे यांच्या प्रचार सभेत आंबेडकरांनी असं वक्तव्य केल आहे.
बहुजन वंचित आघाडीकडून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघासाठी उमेदवार कारु नान्हे हे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारा करीता भंडारा शहरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला संबोधित करताना प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर निशाणा साधला. तसेच त्यांनी शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरही टीका केली . पुढे बोलताना ते म्हणाले कि वंचित बहुजन आघाडीने उमेदवार लढविल्याने प्रफुल पटेल आणि शरद पवार यांनी स्वत: निवडणूक लढण्याचे टाळले आहे या पूर्वी प्रफुल पटेल हे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातुन लोकसभेत गेले होते.