बहुजननामा ऑनलाइन – शहरात रेकीकरून दुचाकी चोरी करणाऱ्या दोघा सराईतांना हडपसर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २ लाख ५५ हजारांच्या १० चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
विष्णू भाऊसाहेब कुंडगिर (वय २१, रा. खेरडा ता उदगीर लातूर) आणि पवन व्यंकट पाटील ( रा निलंगा लातूर ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
विष्णू भाऊसाहेब कुंडगिर (वय २१, रा. खेरडा ता उदगीर लातूर) आणि पवन व्यंकट पाटील ( रा निलंगा लातूर ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
शहरात लूटमारीसोबतच वाहन चोरीचे प्रकार सुरू आहेत. या चोरट्यांचा शोध घेणे आणि या घटनांना पायबंद लावण्यासाठी पोलीस पेट्रोलिंग व गस्त घालत होते. दरम्यान हडपसर पोलिस उपनिरीक्षक सौरभ माने , नितीन मुंढे, प्रशांत टोनपे पेट्रोलिंग करीत होते. यावेळी नाकाबंदीत पोलिसांनी विष्णू व पवनला थांबवून कागदपत्राबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना हडपसर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. चौकशीत दोघेही रेल्वे पोलीस तसेच हैदराबाद पोलीसांच्या रेकॉडवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून २ लाख ५५ हजारांच्या १० दुचाकी जप्त करण्यात आल्या. पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे , पोलीस निरीक्षक हमराज कुंभार, पोलीस निरीक्षक सौरभ माने, युसूफ पठाण, राजेश नवले, सैदोबा भोजराव, नितीन मुंढे, गोविंद चिवळे, प्रशांत टोनपे यांच्या पथकाने केली.