बहुजननामा ऑनलाईन : कधीकधी जास्त ताणामुळे लोक रात्री उपाशी पोटीच झोपायला जातात. त्याच वेळी, काही लोकांना असेही वाटते की, रात्री शरीरात पाचक क्रिया (मेटाबोलिज्म) मंद होते, म्हणून ते रात्रीच्या जेवणाकडे दुर्लक्ष करतात. परंतु रिकाम्या पोटी झोपण्याची त्यांची हि सवय किती नुकसान करीत आहे, याची त्यांना कल्पनाही नाही. यामुळे, शरीर कमकुवत होते आणि बरेच रोग देखील उद्भवू शकतात. जाणून घेऊया रिकाम्या पोटी झोप घेणे आरोग्यासाठी किती हानिकारक आहे.
यासंदर्भात, फ्लोरिका स्टेट युनिव्हर्सिटीचे म्हणणे आहे की, जे रात्रीचे जेवण करतात त्यांना उपाशी पोटी झोपलेल्यांपेक्षा जास्त उत्साही वाटते. त्याच वेळी, जे लोक रात्री उपाशी पोटी झोपतात त्यांना दुसर्या दिवशी खूप थकवा जाणवतो. याचा त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे निद्रानाश देखील होतो. विद्यापीठाच्या मते, रात्री उपाशी झोपल्याने पोटात अनेक आजार होऊ शकतात. जसे की – गॅसची समस्या आणि पोटदुखी. बर्याच वेळा, संपूर्ण रात्र कूस बदलूनच जाते आणि झोपेवर देखील वाईट परिणाम होतो.
स्लिम ट्रिम होऊ इच्छित बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की, रात्री आहार न खाल्याने त्यांचा लठ्ठपणा कमी होईल. म्हणूनच त्यांना दररोज रात्री रिकाम्या पोटी झोपण्याची सवय लागते ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे त्यांचे वजन पूर्वीपेक्षा जास्त वाढते. त्याऐवजी, आपण रात्री हलके आणि पचण्याजोगे अन्न घेऊ शकता जेणेकरून शरीरात पोषणाचा अभाव असेल. बर्याच लोकांना असे वाटते की डिनर वगळण्यामुळे वजन कमी होईल. पण हे अगदी चुकीचे आहे. उपाशी पोटी घेतलेली झोप आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. हे आपले वजन कमी करत नाही, तर आणखी वाढवते. रात्री हलके आणि कमी अन्न खा पण रिकाम्या पोटी झोपू नका.