पुणे : बहुजननामा ऑनलाइन – सिंहगड परिसरात आज एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन वर्षाचा मुलगा खेळण्याच्या नादात थेट नाल्यात पडला आहे. मुलाचे नाव संस्कार बंडू आहे. गुरुवारी ही दुपारी घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने शोधकार्य सुरु केले आहे.
संध्याकाळपर्यंत अग्निशामक दलाने मुलाचा शोध सुरु ठेवला. मात्र, बचाव पथकाला संस्कार काही सापडला नाही. अंधार पडल्याने बचाव कार्य थांबविण्यात आले. आज सकाळी पुन्हा बचाव कार्य सुरु झाले आहे.
नाल्यात 8 ते 10 फुट खड्डा असून नाल्यातून पाणी सतत वाहत असते. अद्याप मुलाचा शोध न लागल्यामुळे कुटुंब चितेंत आहे. साबळे कुटुंबीय मराठवाड्यातून पुण्यात येऊन स्थायीक झाले होते. नाल्याची परिस्थिती खूप बेकार आहे.
नेमके मुलासोबत काय झाले ?
दोन वर्षाचा मुलगा संस्कार अचानक खेळता खेळता नाल्यात पडला आणि साबळे कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागला. मोठ्या प्रमाणात तपासणी करुन देखील मुलगा न सापडल्यामुळे साबळे कुटुंबीय खूप चिंतेत आहे. त्यातच नाल्याची परिस्थिती इतकी वाईट आहे की, पुढील शोध घेण्यासाठी यंत्रणेला मोठा अडथळा येत आहे. नाल्यामध्ये अनेक झाडे झुडपे आहेत आणि रोडा रोड असल्यामुळे अग्निशमन दलाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर कुटुंबीय अजूनही चिंतेत आहे.