पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Police | पुणे शहरातील कोरोना (Coronavirus) बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. रस्त्यावर तसेच विविध बंदोबस्तात सहभागी होणारे पोलीसही कोरोना बाधित होऊ लागले आहेत. कोरोनाच्या तिसर्या लाटेत आतापर्यंत शहर पोलीस दलातील १४१ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली आहे.
सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police ) राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांना अटक केली होती. त्यांची न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. याशिवाय या गुन्ह्यातील आश्विनकुमार, आशुतोष शर्मा, निशीद गायकवाड, राहुल लिंघोट, शिवकुमार अन्य ५ आरोपींना कोरोनाची लागण झाली आहे. सायबर व आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके (DCP Bhagyashree Navtake) यांच्यासह ११ अधिकारी व कर्मचार्यांनाही संसर्ग झाला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दोन दिवसात दीड हजारांवर विना मास्क कारवाई
शहरातील कोरोना संसर्ग वाढू लागल्याने शहर पोलीस दलाने आता सार्वजनिक ठिकाणी विना मास्क (Withour Mask) फिरणार्यांवर कारवाई (Pune Police Action) करण्यास सुरुवात केली होती. गेल्या दोन दिवसात सुमारे दीड हजार लोकांना प्रत्येकी ५०० रुपये दंडात्मक कारवाई करुन त्यांच्याकडून साडेसात लाख रुपये वसुल करण्यात आले आहेत. यापुढे ही कारवाई अधिक कडक करण्यात येणार आहे.
Web Title :- Pune Police | 141 policemen in Pune city police force infected with corona; Action started on unmasked pedestrians action on one and a half thousand in 2 days
Pune Crime | पुण्यात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पती, सासूला अटक
MLA Prasad Lad | ‘कोरोनाच्या नावाखाली वेगळी दुकानदारी तर करण्याचा हेतू नाही ना?’
Kalicharan Maharaj | प्रक्षोक्षक व चिथावणीखोर भाषण देणाऱ्या कालिचरणला जामीन मंजूर