पुणे : बहुजननामा ऑनलाइन – PMC Online Gunthewari | पुणे महापालिकेच्यावतीने (Pune Corporation) १० जानेवारीपासून गुंठेवारीचे (Gunthewari) प्रस्ताव दाखल करून घेतले जाणार आहेत. गुंठेवारीची प्रकरणे ऑनलाईन स्विकारण्यात (PMC Online Gunthewari) येणार असून पुढील कार्यपद्धतीची माहिती आज महापालिकेच्या शहर अभियंता कार्यालयाने प्रसिद्ध केली आहे.
राज्य शासनाच्या आदेशानुसार ३१ डिसेंबर २०२० पुर्वीची अनधिकृत घरे (Unauthorized Houses) आणि इमारतींचे मालक (Building Owner) १० जानेवारीपासून महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे (PMC Construction Department) ऑनलाईन पद्धतीने आर्किटेक्ट अथवा लायसन्स इंजिनिअर मार्फत प्रस्ताव दाखल करू शकतील. हे प्रस्ताव दाखल केल्यानंतर महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील शहर अभियंता कार्यालयाच्या आवक- जावक अर्थात सिंगल विंडोमधून प्रस्ताव तपासून चलन घ्यायचे आहे.
चलनाच्या रकमेचा भरणा महापालिकेच्या तळमजल्यावर बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये किंवा ऑनलाईन पद्धतीने केल्यानंतर भरणा केलेले चलन व गुंठेवारीची संपुर्ण फाईल व कागदपत्रे बांधकाम विभागाच्या आवक- जावक विभागाकडे जमा करायची आहेत. (PMC Online Gunthewari)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आवक जावक विभागात प्राप्त झालेली गुंठेवारीची प्रकरणांची पेठनिहाय यादी करून ती संबधित झोनमध्ये कार्यरत असलेल्या बांधकाम निरीक्षकांकडे हस्तांतरीत केली जाणार आहेत. बांधकाम विभागाने सातही झोनमधील गुंठेवारीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी बांधकाम निरीक्षक, उपअभीयंता आणि कार्यकारी अभियंता यांची जबाबदारी निश्चित केली आहे. यासंदर्भातील लेखी आदेशच आज बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी काढले आहेत.
Web Title :- PMC Online Gunthewari | PMC ready to start online gunthewari regularisation process from January 10
Rakesh Jhunjhunwala चा ‘हा’ स्टॉक पोहचला ऑल-टाइम हाय ! पुढे काय आहे शक्यता? जाणून घ्या
Pune Crime | पुण्यात निवृत्त पोलीस महासंचालकांच्या बहिणीच्या घरावर चोरट्यांचा डल्ला
Karuna Sharma | धनंजय मुंडेंविरोधात निवडणूक लढण्याच्या घोषणेवरून करुणा शर्मा म्हणाल्या…
PM Kisan अंतर्गत खात्यात आली नसेल रक्कम तर काय करावे, कसे ट्रान्सफर होतील 2000 रुपये? जाणून घ्या