Pune Pimpri Chinchwad Crime News | किरकोळ कारणावरून महिलेला शिवीगाळ करुन विनयभंग, दोन महिलांसह तिघांवर FIR; मुंढवा परिसरातील प्रकार

Molestation Case

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | खिडकी बाहेर कचरा टाकल्याच्या कारणावरुन एका महिलेला शिवीगाळ केली. तसेच कुऱ्हाडीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी (Death Threats) देऊन महिलेसोबत गैरवर्तन केले. याप्रकरणी दोन महिलांसह तीन जणांवर मुंढवा पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.4) दुपारी दीड ते दोन या दरम्यान घोरपडी गावात घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याबाबत 28 वर्षीय महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन अक्षय दिपक हंस (वय-32) याच्यासह दोन महिलांवर आयपीसी 354, 452, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकमेकांचे नातेवाईक आहेत.
फिर्यादी यांनी त्यांच्या घराच्या खिडकी मधून कचरा बाहेर टाकल्याच्या कारणावरुन फिर्यादी आणि यांच्या जाऊबाई
यांच्यात भांडण सुरु होते. त्यावेळी महिला आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ केली.
तसेच दुसऱ्या आरोपी महिलेचा पती अक्षय हंस याने फिर्यादी यांना हाताने मारहाण केली.
फिर्यादी घरात गेल्या असता अक्षय हंस हा त्यांच्या मागोमाग घरात गेला.
त्याने हातातील कुऱ्हाडीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली.
तसेच फिर्यादी यांच्यासोबत गैरवर्तन करुन विनयभंग (Molestation) केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिनवडे करीत आहेत.