Pune Pimpri Chinchwad Crime News | लग्नाचे आमिष दाखवून विधवा महिलेवर बलात्कार, आरोपी गजाआड; लोणी काळभोर परिसरातील घटना

Rape Case

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | विधवा महिलेला लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार (Rape) केला. त्यानंतर लग्न करण्यास नकार देऊन धमकी दिल्याचा प्रकार हवेली तालुक्यातील सोरतापवाडी येथे घडला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी (Pune Police) एकाला अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार जुन 2023 मध्ये महिलेच्या राहत्या घरी व कुंजीरवाडी येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याबाबत 28 वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) शुक्रवारी (दि5) फिर्याद दिली आहे. यावरुन तानाजी माणिक कोळेकर (वय-47 रा. सोरतापवाडी, पुणे) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, 504, 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीचे निधन झाले आहे. तुला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे.
माझी पत्नी माझ्या सोबत भांडत असते. तु जर माझ्यासोबत प्रेम संबंध (Love Affair) ठेवले तर मी पत्नी व मुलांना
सोडून तुझ्यासोबत लग्न करतो, असे आमिष आरोपीने महिलेला दाखवले.
यानंतर आरोपीने महिलेसोबत जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
पीडित महिलेने लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने शिवीगाळ केली.
तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर सोडणार नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.