पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime | अल्पवयीन मुलीच्या घरात जबरदस्तीने घुसून सुरक्षा रक्षकाने (Security Guard) तिच्यासोबत गैरवर्तन करुन विनयभंग (Molestation Case) केला. तसेच स्वत: आरडाओरडा करुन सोसायटीमधील लोकांना जमा केले. जमा झालेल्या सोसायटीमधील लोकांनी देखील पीडित मुलीसोबत हुज्जत घातल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Chinchwad Crime) पिंपरी मधील अजमेरा रोडवरील (Ajmera Road) एका सोसायटीत 2 फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पीडित 17 वर्षाच्या मुलीने (Minor Girl) पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station)
सोमवारी (दि.6) तक्रार दिली आहे. त्यानुसार सोसायटीचा सुरक्षा रक्षक उमेश (पुर्ण नाव पत्ता माहित नाही)
व सोयायटी मधील 30 ते 40 जणांवर 354, 323, 504, 506, 143, 147, 149 सह पॉक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी राहत असलेल्या सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम
करतो. 2 फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास फिर्यादी या त्यांच्या घरात भावासोबत बसल्या होत्या.
त्यावेळी आरोपी हा फिर्यादी यांच्या घरी आला. त्याने फिर्यादी यांच्या सोबत गैरवर्तन (Abuse) केले.
तसेच तिच्या चारित्र्याबद्दल अपशब्द बोलून तिचा विनयभंग केला. यानंतर सुरक्षा रक्षकाने आरडाओरडा
करुन सोसायटीमधील नागरिकांना बोलावून घेतले.
सोसायटी मधील लोकांनी पीडित मुलीसोबत हुज्जत घालून तिच्यासोबत भांडण केले.
याप्रकरणी मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime | Maltreatment of minor girl by security guard, molestation of girl by society people; Shocking type in Pimpri
हे देखील वाचा :
Hingoli Accident News | पतीला उपचारासाठी नेताना रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; जोडप्याचा जागीच मृत्यू