बहुजननामा ऑनलाईन टीम – मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सध्या खूपच चर्चेत आहे. ती ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या शोचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. प्राजक्ता तिच्या अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेन्समुळे चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते. प्राजक्ताने (Prajakta Mali) नुकताच तिचा म्हाळसा लूक शेअर केला आहे. तिचा हा लूक सध्या चाहत्यांना भुरळ पाडताना दिसत आहे. तिच्या व्हिडिओवर कौतुकांचा वर्षाव होताना दिसत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने नुकताच सुरू केलेला प्राजक्तराज या पारंपारिक मराठी साज दागिना कलेक्शनला एक महिना पूर्ण झाल्याने तिने हा लुक शेअर केला आहे. यावेळी प्राजक्ताने आकाशी रंगाची सहावारी साडी ब्लॅक कलरचे स्लिव्हलेस ब्लाऊज आणि त्यावर पारंपारिक पद्धतीचे दागिने परिधान केले आहेत. यामध्ये तिने पायात पैंजण, गळ्यात दागिने, हातात बांगड्या, कमरेला कंबरपट्टा, नाकात नथ, कानात सिल्वर रंगाचे कर्णफुल, कपाळावर चंद्रकोर तर यावेळी तिने केसांचा अंबाडा, बाजूबंद आणि हेवी मेकअपसह आपला लूक पूर्ण केला आहे. प्राजक्ताचा हा पारंपारिक लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
प्राजक्ताच्या (Prajakta Mali) या फोटो व्हिडिओ वर चाहते कमेंटचा वर्षाव करताना दिसत आहेत.
प्राजक्ताच्या मागील हिरवीगार झाडे देखील तिच्या या लुकला चार चांद लावल्याचे दिसत आहेत.
प्राजक्ताचे लाजणे हसणे हे प्रत्येक फोटोमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
तर अनेकांनी प्राजक्ताच्या या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजी सेंड करत तिचे कौतुक केले आहे.
Web Title :- Prajakta Mali | actress prajakta mali recently shared a video in a sky blue saree and a black color seamless blouse
हे देखील वाचा :