पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | पतीला मारण्याची आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत महिलेसोबत अश्लील बोलून विनयभंग (Molestation) केल्याचा प्रकार कोंढवा परिसरात घडला आहे. याप्रकरणी सराईत गुन्हेगारावर (Criminal) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार (Pune Crime News) शनिवारी (दि.4) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत 30 वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. तर वसीम रशीद हजारी उर्फ लाला (Wasim Rashid Hazari alias Lala) याच्यावर आयपीसी 364,507 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. आरोपी वसीम हा कोंढवा पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची पत्नी आणि फिर्यादी यांचे पती हे एकाच कंपनीत काम करतात.
एकाच ठिकाणी काम करत असल्याने त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध होते.
आरोपीने फिर्यादी यांना मोबाईलवर फोन करुन अश्लील भाषेत बोलला.
तसेच फिर्यादी यांच्या पतीला मारण्याची (Kill) व खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी (Threat)
दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याबाबत फिर्यादी यांनी कोंढवा पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता.
अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | Woman molested by threat to implicate husband in false crime, Sarait criminal FIR; Incidents in Kondhwa area
हे देखील वाचा :