पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime | जबरदस्तीने घरात घुसून महिलेसोबत अश्लील बोलून तिचा विनयभंग (Molestation) केला. तसेच महिलेच्या वडिलांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार चाकण येथे घडला आहे. हा प्रकार रविवारी (दि.19) रात्री पावणे दहाच्या सुमारास खेड तालुक्यातील नाणेकरवाडी येथे घडला आहे. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पीडित महिलेने सोमवारी (दि.20) चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी विजय मोहन राठोड Vijay Mohan Rathod (वय-32 रा. खराबवाडी, चाकण) याच्यावर आयपीसी 509, 354, 452, 324, 427, 504, 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या घरामध्ये एकट्या असताना आरोपी जबरदस्तीने त्यांच्या घरात घुसला व त्याने अश्लील बोलत त्यांच्यासोबत गैरवर्तन केले.
फिर्यादी महिलेने आरोपीला विरोध केला असता त्याने शिवीगाळ (Abuse) करुन तुला इथे राहू देणार नाही अशी
धमकी (Threat) दिली. तसेच घरासमोर पडलेला दगड हातात घेऊन महिलेला मारहाण केली.
त्यावेळी महिलेचे वडील त्यांना सोडवण्यासाठी आले असता आरोपीने त्यांनाही हाताने मारहाण केली.
तसेच घरातील सामानाची तोडफोड केली. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.
Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime | Father beaten for molesting woman, accused arrested; Incidents in Chakan area
हे देखील वाचा :
Bhandara Crime News | भंडाऱ्यात मळणी यंत्रात साडी अडकून शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू