Pune Kasba Peth Bypoll Election | ‘…तर कसब्याच्या प्रत्येक चौकातील गणपती मंडळ ‘श्रीमंत’ व्हायला वेळ लागणार नाही’; रविंद्र धंगेकरांचा हेमंत रासनेंवर नाव न घेता निशाणा; ‘ती’ फेसबुक पोस्ट चर्चेत

Pune Kasba Peth Bypoll Election | mahavikas aghadi candidates ravindra dhangekar facebook post viral

पुणे : बहुजननामा ऑनलाईन  Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या मतदानाला काही दिवस शिल्लक असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. दिवसेंदिवस पोटनिवडणुकीमध्ये चुरस वाढत चालली आहे. पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून कसब्यामध्ये करण्यात आलेली बॅनरबाजी निवडणुकीपेक्षा जास्त चर्चेचा विषय ठरली आहे. त्यातच राजकीय फायद्यासाठी देवाचा वापर केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केला आहे. धंगेकर यांनी फेसबुक पोस्ट करत हा आरोप केला असून त्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्यावर नाव न घेता आरोप केला आहे. (Pune Kasba Peth Bypoll Election)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

काय लिहिलंय पोस्टमध्ये?

यांचा सोनं-चांदी वाटण्याचा स्पीड असाच राहिला तर कसब्यातील प्रत्येक चौकातील गणपती मंडळ ‘श्रीमंत’ व्हायला वेळ लागणार नाही!! विश्वस्त साहेब, स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी आमच्या गणपती बाप्पाचा वापर करणं बंद करा, असं रविंद्र धंगेकर यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांची ही पोस्ट कसब्यात चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे.

 

https://www.facebook.com/photo/?fbid=733643868776662&set=a.437419065065812

 

रविंद्र धंगेकर यांनी ही फेसबुक पोस्ट करुन भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. हेमंत रासने हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विश्वस्त आहेत. मतदानासाठी गणपती मंडळांना सोनं-चांदी वाटप करत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला आहे. आता यावर भाजपच्या गोटातून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

 

कसबा पेठ पोटनिवडणुकीत हेमंत रासने विरुद्ध रविंद्र धंगेकर यांच्यात लढत होत असली तरी खरी लढत ही
भाजप विरुद्ध महाविकास आघाडीत होत आहे. दोन्ही राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे.
ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजप-शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना या पोटनिवडणुकीत पाहायला मिळत आहे. त्यातच निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्याने पोटनिवडणुकीत याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. आयोगाच्या निर्णयावर मविआच्या नेत्यांकडून भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यामुळे कसबा पेठ पोटनिवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.

 

 

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | mahavikas aghadi candidates ravindra dhangekar facebook post viral

 

हे देखील वाचा :

Kangana Ranaut | दादासाहेब फाळके पुरस्कारांबद्दल कंगना रणौतने नाराजी व्यक्त करत नेपोटीजमवर केली टीका; म्हणाली…

Bhandara Crime News | भंडाऱ्यात मळणी यंत्रात साडी अडकून शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Gautami Patil | गौतमी पाटीलचा ‘खान्देश कन्या’ पुरस्काराने गौरव; गौतमीला मायभूमीतून मिळाले बळ

Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | कसबा, चिंचवडमधील 80 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचा प्रत्यक्ष मतदान करण्यावर भर, टपाली मतदानाकडे फिरवली पाठ