Bhandara Crime News | भंडाऱ्यात मळणी यंत्रात साडी अडकून शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Bhandara Crime News | farmer woman dies after her saree gets stuck in the threshing machine incident in bhandara

भंडारा : बहुजननामा ऑनलाईन  Bhandara Crime News | भंडाऱ्यात एक मन हेलावून टाकणारी दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये शेतातील उडीद पिकाची मळणी सुरू असताना मळणी यंत्रात साडी सापडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील दोनाड या ठिकाणी घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Bhandara Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

काय घडले नेमके?
शीतल धर्मशील कोचे (वय 52 वर्ष) असे या मृत महिलेचे नाव आहे. सध्या भंडारा जिल्ह्यात उडीद,सोयाबीन,वाटाणा,हरभरा अशा विविध पिकांची काढणी करून त्याची मळणी करणे सुरू आहे. शीतल यादेखील आपल्या शेतात मळणी करायला गेल्या होत्या. उडीद पिकाची मळणी करण्यासाठी रुपचंद बगमारे यांचे ट्रॅक्टर सह मळणी यंत्र सुरू होते. यावेळी शीतल मळणी यंत्र आणि ट्रॅक्टरच्या मधोमध उभे राहून मळणी करत होत्या. (Bhandara Crime News)

 

यावेळी अचानक त्यांची साडी लोखंडी सॉफ्टिंगला अडकून त्या त्यामध्ये गुरफटल्या.
यानंतर त्यांना फास लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
लाखांदूर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. शीतल यांच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त
केली जात आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :-  Bhandara Crime News | farmer woman dies after her saree gets stuck in the threshing machine incident in bhandara

 

हे देखील वाचा :

Gautami Patil | गौतमी पाटीलचा ‘खान्देश कन्या’ पुरस्काराने गौरव; गौतमीला मायभूमीतून मिळाले बळ

Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | कसबा, चिंचवडमधील 80 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचा प्रत्यक्ष मतदान करण्यावर भर, टपाली मतदानाकडे फिरवली पाठ