पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Navale Bridge Accident | बंगलोर – मुंबई हा राष्ट्रीय महामार्गावरील कात्रज नवीन बोगद्याकडून आलेला नवले पुलापर्यंतचा रस्ता हा मृत्युचा सापळा ठरला आहे. या ठिकाणी सातत्याने प्राणघातक अपघात घडत असतात. मंगळवारी सकाळी नवले पुलाच्या जवळ एका कंटेनरला भीषण अपघात झाला. सुदैवाने यावेळी बाजूला वाहने नसल्याने जीवित हानी झाली नाही. या अपघातात कंटेनरचा चालक जखमी झाला आहे. सकाळी ९ वाजता ही घटना घडली. (Pune Navale Bridge Accident)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सातार्याकडून एक कंटेनर मुंबईच्या दिशेने जात होता. नवले पुल संपल्यानंतर कंटेनर चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे कंटेनरचा ट्रेलर त्याच्या केबिनवर आदळला़ व तो दुभाजकावर आला. या घटनेत त्यात केबिनचा चक्काचुर झाला. पोलिसांनी तातडीने क्रेन मागवून कंटेनर बाजूला करण्यास सुरुवात केली आहे. या अपघातामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
web title : pune navale bridge accident terrible container accident near navale bridge driver injured traffic jam.