पुणे :बहुजननामा ऑनलाईन – Pune Local Train | राज्य सरकारने (Maharashtra Government) राज्यातील काही जिल्ह्यांना निर्बंधातून सूट दिली आहे. तसेच, 15 ऑगस्टपासून मुंबई लोकल ट्रेन (Mumbai) देखील सामान्यांसाठी सुरु करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे – लोणावळा (Pune – Lonavla) लोकल आणि पुणे – दौंड (Pune – Daund) डेमू प्रवासासाठी (Pune local train) सामान्यांना परवानगी दिली जाणार आहे. परंतु, त्यांसाठी प्रवाशांचे 2 डोस (2 doses) झाले पाहिजेत आणि दुसरा डोस घेऊन 14 दिवसांचा कालावधी व्हायला हवा. यासाठी प्रवाशांना आवश्यक असणारा फोटोपास पोलिसांकडून देण्यात येणार आहे. लवकरच याबाबतची कार्यवाही सुरू होईल. असं सांगण्यात आलं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुणे – लोणावळा (Pune – Lonavla) लोकलच्या दिवसातून 4 फेऱ्या होत आहे. तर पुणे – दौंड (Pune – Daund) दरम्यान देखील दिवसातून 4 फेऱ्या होत आहे. सध्या तरी लोकलच्या फेऱ्या वाढविण्याबाबत रेल्वेने कोणताही विचार केला नाही. दरम्यान, याबाबत अद्याप कोणाकडूनही फेऱ्या वाढविण्याची मागणी झालेली नाही. प्रवाशांची संख्या पाहून याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचं म्हटलं आहे.
या दरम्यान, लोकलने प्रवास करणाऱ्यांना फोटो असलेला पास दिला जाणार आहे.
तो पास असेल तरच त्यांना लोकलचे तिकीट दिले जाईल.
यासाठी प्रवाशांनी पोलीस प्रशासनाकडे (Police administration) आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज करणे आवश्यक असणार आहे.
अर्ज केल्यानंतर अर्जाची छाननी करून निकषात बसणाऱ्या प्रवाशांना पास दिला जाणार आहे.
Web Title : Pune local train | mumbai rules will apply pune only those who have taken two doses can travel locally
IPCC Report | आगामी काही वर्षात मुंबईसह 12 शहरांना मोठा धोका? ‘या’ रिपोर्टनुसार धक्कादायक खुलासा