औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – Anti Corruption Trap | जागेचा रेखांकन नकाशा बरोबर आहे की नाही असे बघून डिमार्केशन नकाशा (Demarcation Map) देण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad district) पैठण भूमी अभिलेख कार्यालयातील सर्वेअरसह (Land Surveyor) खासगी ठेकेदारला 90 हजार रुपयांची लाच स्विकारताना (Accepting Bribe) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा (Anti Corruption Trap) रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.9) करण्यात आली. या कारवाईमुळे भूमी अभिलेख कार्यालयात (Paithan Land Record Office) खळबळ उडाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सर्वेअर अनिल विष्णू सावंत Anil Sawant (वय- 37) आणि त्याचा भाऊ खासगी ठेकेदार सचिन विष्णू सावंत Sachin Sawant (वय – 24) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 32 वर्षीय व्यक्तीने औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे स्थापत्य अभियांत्रिकी सल्लागार (Civil Engineering Consultant) आहेत. त्यांचेकडे आलेल्या पक्षकार यांचे कृषक जमिनीचे अकृषक जमिनीत रूपांतर करण्यासाठी, जागेचा रेखांकन नकाशा बरोबर आहे की नाही असे बघून डिमार्केशन नकाशा तयार करून देण्यासाठी अर्ज केला होता.
या कामासाठी सर्वेअर अनिल सावंत यांनी सुरुवातीला 45 हजार रुपये घेण्याचे मान्य केले होते.
मात्र त्यानंतर 90 हजाराची मागणी केली.
तक्रारदार यांनी औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
लाचेची पडताळणी केली असता सर्वेअर अनिल सावंत यांना त्याचा भाऊ आणि खासगी ठेकेदार
सचिन सावंत याच्याकडे लाचेची रक्कम देण्याचे सांगितल्याचे निष्पन्न झाले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून 90 हजार रुपयांची लाच घेताना सचिन सावंत याला रंगेहाथ पकडले.
सचिन सावंत याने भाऊ सर्वेअर अनिल सावंत याच्या सांगण्यावरून लाच स्विकारली.
दोघांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title : Anti Corruption Trap | Private contractor with land records office surveyor caught taking Rs 90,000 bribe
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
IPCC Report | आगामी काही वर्षात मुंबईसह 12 शहरांना मोठा धोका? ‘या’ रिपोर्टनुसार धक्कादायक खुलासा