पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा मतदार संघात 30 वर्षात भाजपने कामेच केली नसल्याने काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार (Mahavikas Aghadi) आणि जनतेच्या हाकेला धावून जाणारे रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना जनतेने उचलून धरल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मतदार आमिषाला बळी पडत नाही पाहून गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना घेऊन मंत्री फिरत असल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. कसब्यातील मतदार सुज्ञ आहे. तो अशा गोष्टी सहन करणार नाही आणि धंगेकर यांनाच प्रचंड मताधिक्याने विजयी करेल असा विश्वास माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. (Pune Kasba Peth Bypoll Election)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कसबा पोटनिवडणुकीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या प्रचारार्थ सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली होती. यानंतर काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी संग्राम थोपटे, मोहन जोशी, रमेश बागवे, अरविंद शिंदे, दीप्ती चौधरी हे पदाधिकारी उपस्थित होते. (Pune Kasba Peth Bypoll Election)
पाटील म्हणाले, महाविकास अघडीसाठी अत्यंत चांगले वातावरण आहे.
ही निवडणूक आगामी महापालिका निवडणुकीसाठी निर्णयाक राहील. कसब्यात भाजपची सत्तेत होता.
30 वर्षात जे केले नाही त्याच कामे करण्याच्या अजेंडा ठेवत आहेत. काँग्रेसचे मित्र पक्ष देखील ताकदीने उभे आहेत.
लोकांचा धंगेकर यांना चांगला पाठिंबा आहे. महिला सिलेंडर चे दर कमी करा अशी मागणी करत आहेत.
मोकातील आरोपी मंत्र्यासोबत फिरत असल्याचे फोटो फिरत आहेत.
येथील मतदार असल्या गोष्टी सहन करणार नाहीत. ते दहशतीला बधनार नाहीत.
निवडणूक आयोगाच्या शिवसेनेबाबतच्या कालच्या निर्णयामुळे उद्भव ठाकरे यांच्याबद्दल जनतेत सहानुभूती वाढली आहे. एखादा पक्षच दुसरीकडे नेणे हे येथील लोकांना सहन होणारे नाही.
आदित्य ठाकरे राज्यभर दौरे करत आहेत. त्यांना चांगला पाठिंबा मिळत आहे.
शिवसैनिक चवताळून उठला आहे. याचा फायदा महाविकास आघडीला होईल.
महाविकास आघडीचे उमेदवार धंगेकर यांना जनता दल सेक्युलर, लोकराज्य जनता पार्टी, वर्ल्ड ह्यूमन राईट,
छावा संघटनेने पाठिंबा दिला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | Dhangekar’s support has shifted the sand under BJP’s feet, that’s why the minister is carrying around the accused in Mokka (MCOCA) – Former Home Minister Satej alias Bunty Patil
हे देखील वाचा :
Rakhi Sawant | गरोदर असल्याच्या चर्चांवर राखी सावंतने सोडले मौन ; आदिल खानवर केले गंभीर आरोप
Sangli Crime News | बिझनेसमध्ये आर्थिक व्यवहारातून झाला वाद; जिवलग मित्रानेच काढला मित्राचा काटा