पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Hadapsar Crime News | हडपसर परिसरातील फुरसुंगी (Fursungi) येथील भोसले व्हिलेजमधील लक्ष्मी निवासमध्ये राहणार्या कुटूंबातील तिघांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर दोघांना उपचारासाठी ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सुर्यप्रकाश हरिश्चंद्र अबनावे Suryaprakash Harishchandra Abnave (70, रा. लक्ष्मी निवास, फुरसुंगी, हडपसर – Hadapsar Police Station) यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तर विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे जनाबाई सूर्यप्रकाश अबनावे Janabaisurya Prakash Abnave (60) आणि चेतन सूर्यप्रकाश अबनावे Chetan Suryaprakash Abnave (41) यांना पुढील उपचारासाठी ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत अधिक माहिती अशी की, अबनावे कुटूंब लक्ष्मी निवासमध्ये रहावयास आहे. आज (सोमवार) त्यांनी राहत्या घराचा दरवाजा आतून बंद करून विषारी औषध प्राशन केले होते. त्यामध्ये सूर्यप्रकाश अबनावे यांचा मृत्यू झाला आहे. इतर दोघांना उपचारासाठी ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिघांनी एकदाच विषारी औषध कशामुळे प्राशन केले हे अद्याप समजु शकलेले नाही.
वरिष्ठ पोलस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पुढील तपास हडपसर पोलिस करीत आहेत.
Web Title : Suicide attempt of three members of the
same family in Fursungi in Hadapsar, huge excitement
- Maharashtra Police News | पोलीस आयुक्त, अधीक्षक कार्यालयांच्या आस्थापनांवरील 68 अस्थायी पदांना
ऑगस्टपर्यंत मुदतवाढ - Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी-चिंचवड : चिखली चौकात भरदिवसा सोन्या तापकीरवर गोळीबार
- Vision Cup Under-15 Cricket Tournament | ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद १५ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा; व्हिजन लायन्स् संघाला विजेतेपद !!