Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी-चिंचवड : चिखली चौकात भरदिवसा सोन्या तापकीरवर गोळीबार

पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | अलिकडील काळामध्ये पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे चित्र समोर येत आहे. काही दिवसांपुर्वीच भरदिवसा तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथे जनसेवा विकास समितीचे (Janseva Vikas Samiti) संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे (Kishor Aware Murder Case) यांची भरदिवसा गोळ्या घालून (Firing In Pimpri) आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. आज (सोमवार) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चिखली चौकात (Chikhali Chowk) उभ्या असलेल्या युवकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
सोन्या तापकीर Firing On Sonya Tapkir (21) याच्यावर गोळीबार झाला असून त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. पुर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाला असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे. भरदिवसा चिखली चौकात घडलेल्या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मारेकर्यांनी गोळीबार करून पळ काढला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी भेट दिली असून चिखली पोलिस (Chikhali Police) घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
गोळीबाराचे नेमके कारण अद्यापही समोर आलेले नाही. परिसरातील CCTV फुटेज तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
Web Title : Pune Pimpri Chinchwad Crime News | Pimpri-Chinchwad: Shooting at
Sonya Tapkir throughout the day at Chikhali Chowk
- Vision Cup Under-15 Cricket Tournament | ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद १५ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा; व्हिजन लायन्स् संघाला विजेतेपद !!
- Ayodhya Trophy Summer League T20 Cricket Tournament | ‘आयोध्या करंडक’ समर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा; लिंजडस् स्पोर्ट्स क्लब, युनायटेड इलेव्हन संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत!
- Pune Crime News | Wanwadi Police Station : वानवडी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून वाहन चोरांच्या मुसक्या आवळल्या, 10 वाहने हस्तगत
Comments are closed.