पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Pune Ganeshotsav | मागील दीड वर्षांपासून कोरोनाने (Corona virus) नागरिकांना हतबल करून टाकलं आहे. कोरोनाच्या महामारीमुळे अनके लोकांची परिस्थिती बिकट झालीय. कोरोनाची परिस्थिती पाहता पुण्यातील यंदाचा गणेशोत्सव कसा साजरा केला जावा? या पार्श्वभूमीवर आज पुणे महापालिकेत (Municipal Corporation) यंदाच्या गणेशोत्सव पूर्वतयारी (Pune Ganeshotsav) या मंडळांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान, मंडळांच्या अध्यक्षांनी आपली मते मांडली समोर मांडली आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दुसऱ्या लाटेने आपण जवळचे लोक गमावले आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात (Ganesh Chaturthi) ऑनलाईन भर देत तसेच सामाजिक उपक्रम राबवत गणेशोत्सव साजरा केला जाईल. अशी भूमिका गणेशभक्तांनी घेतली आहे. बैठकीदरम्यान, दीड वर्षात सर्वच गोष्टींवर बंधने आली आहेत. कोरोनाबाबत जनजगृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी मंडळांना झिरो बजेट कार्यक्रम (Zero budget program) द्यावेत. तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी लसीकरण, कोरोना नियम याबाबत समाजप्रबोधन कार्यक्रमाची परवानगी द्यावी असं त्यावेळी म्हटलं आहे.
यंदाचा गणेशोत्सव (Ganesh Chaturthi) एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. तसेच, वैभवशाली उत्सवावर कोरोनाने सावट अद्यापही आहे. यावरून मंडळांची बैठक घेतली होती. यावेळी गणेश मूर्ती विर्सजनावर महत्वाची भूमिका मांडली आहे. दरम्यान, महापालिकेने मूर्तीदान या उपक्रमाचा विचार करावा. त्यांचे स्टोरेज करण्याची तयारी करावी. तसेच लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. शहरातून साडे चार लाख मूर्ती विसर्जन होत असतात. त्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. असं कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.
या दरम्यान, गणेशोत्सव साधेपणा ने साजरा होणारच आहे.
मात्र, असंख्य कार्यक्रम, शिबिरे हि जर ऑनलाइनद्वारे राबवली. आणि गर्दी टाळण्याचा प्रयत्न केला.
तरी युट्यूब, फेसबुकवर हे कार्यक्रम वर्षानुवर्षे राहतात. त्यानुसार या कर्यक्रमांवर भर द्यावा.
तसेच, शहरात अधिकाधिक निर्बंध असतात.
उपनगरात त्या तुलनेत निर्बंध वाढवणायची गरज लागत नाही.
प्रशासन (Administration) नियम वेगळे सांगते.
पोलिसांकडून (Police) नियम अजुन कडक केले जातात. दोघांच्यात तफावत नसावी.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भजन, कीर्तने, समाजप्रबोधनात्मक कार्यक्रमाला परवानगी मिळाली आहे.
त्यासाठी नियमावली जाहीर करावी. असं सांगण्यात आलं आहे.
‘पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी घेतलेल्या निर्णयाचे महापालिका (Pune Municipal Corporation) स्वागतच करत आहे. मंडळांना उत्सवात कोणतीही अडचण येणार नाही. 2019 ला जे परवाने देण्यात आले होते. तेच यावर्षी चालणार आहेत. कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात येण्याची गरज भासणार नाही. तसेच मूर्ती विसर्जनासाठी पालिकेकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. कृत्रिम हौद वाढवण्याबरोबरच, गणेश मूर्ती विसर्जनसाठी लागणाऱ्या पावडर मुबलक प्रमाणात मागवण्यात आली आहे. तसेच शहरातील 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या शाळा, मैदाने आणि मोकळया जागेत पाण्याचे हौद बांधण्यात येणार आहेत.
– मुरलीधर मोहोळ (महापौर मनपा) mayor murlidhar mohol
‘पुणे शहरात अजूनही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दिवसाला दोनशेच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. महापालिकेच्या वतीने गणेश मंडळांना सहकार्य केले जाईल. मंडळांनीही समाजभान ठेवून उत्सव साधेपणाने साजरा करावा. पुणे महानगपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले आहे.”
– विक्रम कुमार (आयुक्त मनपा) pune municipal commissioner vikram kumar
Web Title : Pune ganeshotsav will be celebrated simply we will look situation and work
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Police Suspended | आरोपीला मदत करणे पडले महागात, पोलिसाचे तडकाफडकी निलंबन; जाणून घ्या प्रकरण